03 March 2021

News Flash

ब्रेन चेअर, हातमोज्यांचा तबला..

पक्षाघात झालेल्या रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे फिरता यावे यासाठी तयार केलेली ‘ब्रेन चेअर’

पक्षाघात झालेल्या रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे फिरता यावे यासाठी तयार केलेली ‘ब्रेन चेअर’, तबला नसतानाही तबल्याचा ध्वनिनिर्माण करणारे जादूई हातमोजे.. निरनिराळे प्रयोग करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या प्रयोगांचे प्रदर्शन करण्याची संधी यंदा मुंबईत पहिल्यांदाच भरणाऱ्या ‘मेकर मेला’च्या निमित्ताने मिळणार आहे. त्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या वस्तूही प्रदर्शनात पाहता येणार आहेत.
भारताला कलांचा, कारागिरीचा व कौशल्यांचा समृद्ध वारसा मिळाला आहे. आपल्या इतिहासातूनही भारतीय कलात्मकतेचे दर्शन घडते. आपण काहीतरी निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास अगदी छोटय़ा छोटय़ा सेवा पुरवठादारांमध्येही पाहायला मिळतो. अगदी घरगुती पापड-लोणची तयार करणाऱ्या गृहिणींमध्येही हा आत्मविश्वास दिसून येतो. केक तयार करणे असो वा मोफत सॉफ्टवेअरचा वापर करून गॅझेट अथवा टूल किंवा दागिने बनविण्याचे कौशल्य असो. असे हे ‘मेकर’ शिवणकामापासून ते तंत्रज्ञानापर्यंत कोणत्याही क्षेत्रात आढळून येतात. या ‘मेकर्स’च्या निर्मितीक्षमतेला प्रोत्साहन देण्याबरोबरच अशा व्यक्तींना एकत्र आणून त्यांची साखळी तयार करणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे. यात पतंग बनविणाऱ्यांपासून ऑटोमोबाइल इंजिनीअर्सपर्यंतच्या सर्व प्रकारचे प्रयोगकर्ते, निर्माते, डिझायनर यांना सहभागी होता येणार आहे. यात वैज्ञानिक, अभियांत्रिकी, तंत्रज्ञ, कलाकार, कारागीर यांनी एकत्र जमून कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घडवून आणण्याकरिता एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे. सोमैया विद्याविहारने पुढाकार घेऊन ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान हा मेळावा भरविण्याची योजना आखली आहे. ‘मेकर इंडिया फाउंडेशन’ तयार करून या माध्यमातून मेकर्सना प्रशिक्षण, मार्गदर्शन पुरविणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्वदेशी व विस्तारक्षम प्रयोगांना प्रोत्साहन देणे आदी काम केले जाणार आहे. समाजातील तळागाळातील प्रयोगशील व उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे सोमैया विद्याविहारचे समीर सोमैया यांनी सांगितले प्रदर्शनात आपली वस्तू मांडण्यात रस असणारे, उत्पानदे विकण्यास इच्छुक असलेले किंवा कार्यशाळा घेण्यात रस असलेल्यांना यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी www.makermela.com या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 8:43 am

Web Title: brain chair and tabla from gloves in maker mela
Next Stories
1 शिवसेनेच्या ‘मराठी बाण्या’चा बिहारमध्ये भाजपला ताप!
2 राज्यात भूसंपादन कायद्याचे भवितव्य अधांतरी
3 कुंभमेळ्यासाठी पाणी नाही! हमी देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Just Now!
X