प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड के ली आहे. त्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कु मार, ‘फोर्स वन’चे अतिरिक्त महासंचालक सुखविंदर सिंह आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचा समावेश आहे.

कुमार, सिंह यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तर शिसवे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांच्यासह बीडचे पोलीस अधीक्षक राजा आर., अमराती ग्रामीणचे अधीक्षक हरी बालाजी एन., पुण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार, गडचिरोलीचे सहायकपोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस नाईक महादेव मडावी, पोलीस शिपाई कमलेश अर्का, हेमंत मडावी, अमुल जगताप, वेल्ला आत्राम, सुधाकर मोगलीवार, बियेश्वर गेडाम, गिरीश ढेकले, नीलेश ढुमणे यांना शौर्य पदक जाहीर करण्यात आले. ठाण्याचे सहायक आयुक्त निवृत्ती कदम, मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांची राष्ट्रपती पोलीस पदकासाठी निवड करण्यात आली आहे.

नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील, मुंबईच्या सहायक आयुक्त कल्पना गाडेकर, पोलीस निरीक्षक राजू बिडकर, अजय जोशी, प्रमोद सावंत, सहायक उपनिरीक्षक जीवन जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले.