27 November 2020

News Flash

उद्यानात स्तनपानाच्या व्यवस्थेची मागणी

शहरातील उद्यानांत बाळासह फिरायला येणाऱ्या महिलांना तेथे स्तनपानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी

शहरातील उद्यानांत बाळासह फिरायला येणाऱ्या महिलांना तेथे स्तनपानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष यामिनी जाधव यांनी केली आहे. मुंबादेवी, महालक्ष्मी, सिद्धिविनायक या मंदिरांमध्येही आलेल्या महिलांना बाळाला दूध पाजण्यासाठी व्यवस्था नाही.

उद्यानांमध्ये अशी व्यवस्था करणे शक्य असून मंदिरांच्या मोकळ्या जागेमध्ये अशी सुविधा उपलब्ध करून देता येईल, त्यामुळे पालिकेने याबाबत तातडीने लक्ष घालून महिलांसाठी सुविधा द्यावी, अशी मागणी जाधव यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 12:20 am

Web Title: breastfeeding management demand in gardan
Next Stories
1 सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६०?
2 मंत्रालयातील एकनाथ खडसेंचे दालन पांडुरंग फुंडकरांना
3 गजानन पाटील लाचप्रकरणात एकनाथ खडसेंना एसीबीकडून क्लीन चीट
Just Now!
X