News Flash

काळबादेवीत स्वदेशी मार्केटमध्ये इमारतींना जोडणारा पूल कोसळला

काळबादेवी येथील स्वदेशी मार्केट परिसरात दोन इमारतींना जोडणारा पूल गुरुवारी सायंकाळी कोसळल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले

| July 24, 2015 04:53 am

काळबादेवी येथील स्वदेशी मार्केट परिसरात दोन इमारतींना जोडणारा पूल गुरुवारी सायंकाळी कोसळल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेतून १२ जण बचावले. त्यात १० पुरुष आणि २ महिलांचा समावेश होता.
स्वदेशी मार्केटमधील चार मजली दोन इमारतींना जोडणारा हा पूल धोकादायक बनला होता. पहिल्या मजल्यावरील या पुलाचा वापर येथील व्यापारी करीत होते. गुरुवारी सकाळी या पुलाचा काही भाग कोसळत असल्याचे काही व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या पुलाचा वापर टाळण्यात येत होता. अखेर सायंकाळी पूल कोसळला. त्याजवळ असलेल्या पत्र्याच्या एकमजली इमारतीत १२ जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कोसळलेल्या पुलाचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. तसेच अडकलेल्या १२ जणांची सुटका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2015 4:53 am

Web Title: breeze collapse in kalbadevi
Next Stories
1 रिलायन्सकडून तीन महिन्यांत २८ कोटी वसूल करा!
2 श्रीमंत असतो तर आम्हीही विदेशात शिक्षण घेतले असते – तावडेंचा चव्हाणांना टोला
3 माजी भाषा संचालक यशवंत कानिटकर यांचे निधन
Just Now!
X