मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या तीन अभियंत्यांसह चौघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. अंतर्गत सजावट करणाऱ्या कंत्राटदाराकडे सहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या अभियंत्यांवर आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार प्राधिकरणाच्या के पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता प्रल्हाद महिशी, दुय्यम अभियंता धनंजय सूर्यवंशी, उपअभियंता चंद्रशेखर दिघावकर यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीच्या पडताळणीत ही बाब स्पष्ट झाली.

लाचेची रक्कम अभियंता महिशी यांच्या कार्यालयात काम करणारा हरीश पाटकर या कामगारामार्फत स्वीकारली जाणार होती. ही बाबही पडताळणीत स्पष्ट झाल्याने पाटकरविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.