News Flash

आणखी एका पुलाला तडे; ग्रँट रोड येथील पूल वाहतुकीसाठी बंद

ग्रँट रोड आणि नाना चौकला जोडणाऱ्या पुलाला तडे गेल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले.  यानंतर हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

संग्रहित छायाचित्र

ग्रँटरोड येथील पुलाला तडे गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपासणीनंतरच पुलाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. या पुलावरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात आली आहे.

ग्रँट रोड आणि नाना चौकला जोडणाऱ्या पुलाला तडे गेल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले.  यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलावरील वाहतूक केनेडी पुलावर वळवण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हा पूल बंद करण्यात आला असून हा पुल ग्रँट रोड स्टेशनजवळ आहे.

दरम्यान, मंगळवारी अंधेरीत गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळला होता. यामुळे दिवसभर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत होती. या पार्श्वभूमीवर ग्रँट रोडमधील पुलाला तडे गेल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 9:51 am

Web Title: bridge at grant road station cracked the traffic diverted to kennedy bridge
Next Stories
1 भूखंड घोटाळा : आरोप मागे घ्या, प्रसाद लाड यांची पृथ्वीराज चव्हाण-निरुपम यांना नोटीस
2 रुळावरुन ढिगारा हटवला, पश्चिम रेल्वे सुरळीत
3 खिशात दमडी नसताना लाखो कोटींच्या अवास्तव प्रकल्पांच्या घोषणा कशाला ? – राज ठाकरे
Just Now!
X