मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १८ जण ठार झाले आहेत. तर १३ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दल आणि NDRF च्या टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मालाडजवळच्या कुरार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी आता ढिगारा उपसण्याचं आणि मदत करण्याचं काम सुरू आहे.

शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. ज्या घटनेत सहा जण ठार झाले आहेत. तर मुंबईतल्या मालाडमध्ये रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. मालाड येथील कुरार भागात ही घटना घडली आहे. रात्रभर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. रात्री दोन वाजल्यापासून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

याबाबत फायर ब्रिगेडचे जवान सर्च ऑपरेशन करत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. रात्रभर मुंबईत तुफान पाऊन पडतो आहे. त्याचमुळे ही भिंत कोसळली आहे.