05 August 2020

News Flash

मंत्री नवाब मलिक यांच्या नगरसेवक भावाची दादागिरी; कामगारांना केली मारहाण

या प्रकाराबाबत मंत्री नवाब मलिक यांची कुठलीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांचे नगरसेवक भाऊ कप्तान मलिक यांनी रस्त्याची कामं करणाऱ्या कामगारांना मारहाण केली.

व्हीव्हीआयपी संस्कृतीच्या मुजोरपणाचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे नगरसेवक भाऊ कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते कामगारांना मारहाण करताना त्यांना कमाबद्दल विचारणा करीत आहेत. तसेच हे कामगार आपल्याला मारु नका, अशी विनवणी त्यांच्याकडे करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये कप्तान मलिक रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगारांना एकामागून एक मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकराबाबत मलिक यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही, टाइम्सनाऊ न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मुंबईत सध्या विविध ठिकाणी रस्त्यांची कामं सुरु आहेत. अशाच एका कामाच्या ठिकाणी काही कामगार काम करीत असताना नगरसेवक कप्तान मलिक यांनी त्यांच्याकडे या कामाची परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा केली. मात्र, याची माहिती नसल्याचे सांगताच चिडलेल्या कप्तान मलिक यांनी या कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करीत पुन्हा या भागात दिसल्यास हातपाय तोडण्याची धमकीही दिली. व्हिडिओमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे.

या प्रकाराबाबत मंत्री नवाब मलिक यांची कुठलीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 4:10 pm

Web Title: brother of minister nawab malik thrashes to workers video going viral aau 85
Next Stories
1 वाडिया रुग्णालयाला दिलासा : महापालिका २२ कोटी देणार
2 धक्कादायक! मुंबईत भाडे नाकारणाऱ्या टॅक्‍सीचालकावर RPF कॉन्स्टेबलने केला बलात्कार
3 खातेदारांची ‘मातोश्री’बाहेर फलकबाजी
Just Now!
X