01 March 2021

News Flash

कल्पक मांडणीतून पानोपानी अर्थसार…

अर्थसंकल्पातील प्रत्येक बाबीचा नेमका अर्थ ‘लोकसत्ता’ वैशिष्ट्ये, आकडेवारी, परिणामकारकता याद्वारे वाचकांना सांगणार आहे.

मंगळवारच्या अंकात अर्थसंकल्प समजून घ्या सहजपणे

मुंबई : अर्थसंकल्प म्हटला की करांचा गुंता, तुटीचे गणित, स्वस्त-महाग म्हणजे नेमके काय, आर्थिक तरतूद आणि तिचा परिणाम. किचकट आकड्यांची चळत आणि आलेखांची स्पर्धा. मात्र मराठी पत्रकारिता विश्वात गेल्या कित्येक दशकांमध्ये अर्थशास्त्रातील अवघड संकल्पना आणि बाबी यांच्या मांडणीतील शिरस्ता मोडून साध्या- सहजपणे अर्थसंकल्प सर्वांना आकलन होईल अशा पद्धतीने विशद करण्याची परंपरा ‘लोकसत्ता’ने गेल्या नऊ वर्षांपासून राबविली. कधी रंगभूमीची  भाषा घेऊन ‘संगीत अर्थकल्लोळा’च्या रूपात, कधी पावसाळी कवितांच्या लयीमध्ये अर्थसंकल्पाला बसवत, कधी तुकारामांच्या रोकड्या अभंगांतून, कधी स्त्री शक्तीला अनुसरून, कधी लोकमान्य टिळकांच्या अर्थविचारांना स्मरून, तर कधी क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करीत अर्थसंकल्पातील ‘सकल राष्ट्रीय आनंद’ दाखविणाऱ्या ‘लोकसत्ता’चा मंगळवारचा अंकही (२ फेब्रुवारी) यंदाच्या अर्थसंकल्पाच्या कल्पक मांडणीने आणि अर्थक्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागाने सादर होणार आहे. अर्थसंकल्पाचे सहज-सोपे विश्लेषण विविध क्षेत्रांतील मान्यवर करणार आहेत. अर्थसंकल्पातील प्रत्येक बाबीचा नेमका अर्थ ‘लोकसत्ता’ वैशिष्ट्ये, आकडेवारी, परिणामकारकता याद्वारे वाचकांना सांगणार आहे.

यंदा कोणती संकल्पना? अर्थसंकल्प सगळेच सांगतात. ‘लोकसत्ता’ त्याचा अर्थही सांगतो… अत्यंत सोपेपणाने.

‘लोकसत्ता’समवेत वाचकांना अर्थसंकल्पाचे सहजज्ञान होईल. याशिवाय एका विशेष संकल्पनेतून अर्थसंकल्पाचे सार वाचायला मिळेल. अशा संकल्पनेशी गुंफून अर्थसंकल्पाचा मथितार्थ उलगडून दाखवणे हे वैशिष्ट्य यंदाही वाचकांसमोर सादर होईल.

विश्लेषक…

वित्त विश्लेषक रूपा रेगे, उद्योग विश्लेषक सुलज्जा फिरोदिया मोटवानी, अभ्यासू राजकारणी तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण, गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ सतीश मगर, सामरिक शास्त्राचे अभ्यासक श्रीकांत परांजपे, वाहतूक-दळणवळण क्षेत्रातील जाणकार अशोक दातार, आरोग्यतज्ज्ञ डॉ. अनंत फडके, गुंतवणूक विश्लेषक अजय वाळिंबे, करसल्लागार प्रवीण देशपांडे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 1:46 am

Web Title: budget understand the budget easily akp 94
टॅग : Budget 2021
Next Stories
1 लोकल पासला मुदतवाढ, सोमवारपासून अंमलबजावणी
2 ‘प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकर घ्या’
3 धान्यसाठा मर्यादा उठविल्याने मोठ्या उद्योगसमूहांना फायदा!
Just Now!
X