ठाणे येथील बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले नगरसेवक हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांना अटकेपासून दिलेला दिलासा उच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबपर्यंत कायम ठेवला. या चौघांच्या अटकपूर्व जामिनावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
चौघांनाही न्यायालायने प्रत्येकी एक लाख रुपयाच्या जातमुलचक्यावर अंतरिम दिलासा देताना न्यायालयाने त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे, त्यांचे भ्रमणध्वनी, पारपत्र पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले तसेच पालिका कार्यालयाच्या परिसरात जाण्यापासून त्यांना मज्जाव केला आहे. सोमवारी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या चौघांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली.