News Flash

गिरगावातील दोन इमारतींचा काही भाग कोसळला, सुदैवाने कोणतीही जीवीत हानी नाही

यातील वासुदेव ही इमारत पालिकेने धोकादायक घोषित केली होती

मुंबईमधील  गिरगावमधील वासुदेव आणि कुमकुम किर्ती नावाच्या दोन इमारतींचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. यात एक महिला जखमी झाली असून इमारतीतील उर्वरित रहिवाशांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. इमारत कोसळल्याची घटना घडल्यानंतर अग्निशमन  दलाच्या ११ गाड्या आणि दोन अॅम्बुलन्स दाखल झाल्या होत्या. इमारतीमध्ये अडकलेल्या दोन्ही इमारतीतील नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही इमारतीमध्ये सामाईक असणाऱ्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने इमारतीच्या नजीकच्या  घरात राहणारी महिला जखमी झाली. या महिलेला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील वासुदेव ही इमारत पालिकेने धोकादायक घोषित केली होती व यातील रहीवासी शनिवापर्यंत आपली घरे रिकामी करणार होते. पडझडीनंतर सामान बाहेर काढण्याचे काम सुरु असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी घडलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 11:46 pm

Web Title: bulding collapce in mumbai
Next Stories
1 विनाहेल्मेट गाडी चालवल्यास आता ५०० रुपये दंड, दिवाकर रावतेंचा नवा आदेश
2 मेट्रोच्या भाडेवाढीला २२ ऑगस्टपर्यंत स्थगिती
3 महाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी, रेकॉर्डब्रेक वेळेत नवा पूल बांधू – मुख्यमंत्री
Just Now!
X