मुंबई-पुणे-हैद्राबाद, मुंबई-नाशिक-नागपूर  बुलेट ट्रेन, सविस्तर प्रकल्प अहवाल आठ ते दहा महिन्यांत

मुंबई: रेल्वे प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी व मुंबई विविध व महत्वाच्या शहरांशी जोडण्यासाठी बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बरोबरच मुंबई ते हैद्राबाद आणि मुंबई ते नागपूर या मार्गावरही बुलेट ट्रेन चालवण्याचे नियोजित के ले आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सुरु झाले असून येत्या आठ ते दहा महिन्यात तो सादर के ला जाईल, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेडकडून देण्यात आली. मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन पुणे मार्गे तर मुंबई ते नागपूर ट्रेन शिर्डी तसेच नाशिकमार्गे जाईल.

मुंबई-पुणे-हैद्राबाद बुलेट ट्रेन या ६५० किलोमीटर मार्गावर एरियल लिडार सर्वेक्षण (लाईट डिटेक्शन अ‍ॅण्ड रेंजिंग सव्‍‌र्हे)सुरु के ला आहे. यामुळे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास मदत मिळणार आहे. एका विमानाला एरियल लिडार व इमेजरी सेन्सर बसविला जातो व विमानाने उड्डाण के ल्यानंतर जमिनीवरील माहिती याद्वारे एकत्रित गोळा के ली  जाते. यातून जमिनीवरील प्रत्येक माहिती अचूक कळते. ही माहिती मिळवण्यास तीन ते चार महिने लागतील. या प्रक्रि येला इतरवेळी साधारणपणे एक वर्षांपेक्षाही जास्त कालावधी लागतो. त्यानंतर अन्य सर्वेक्षणही के ले जाणार असून एकू णच सविस्तर प्रकल्प अहवाल पुढील वर्षांत जानेवारी ते मार्च या दरम्यान सादर के ला जाईल, असे सांगण्यात आले.

Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
mmrda to build third mumbai around atal setu
नवी मुंबईतील ‘नवनगरा’स तीव्र विरोध; कोकण भवनात शेकडो गावांमधून १० हजारांवर हरकती   

याच पद्धतीने मुंबई ते नाशिक-नागपूर या ७३६ किलोमीटर मार्गाचेही एरियल लिडार सव्‍‌र्हेक्षण गेल्या तीन महिन्यांपासून सुरु के ले आहे. या वर्षांच्या अखेरीस पूर्ण होईल. ही ट्रेन मुंबई ते नागपूर दरम्यान खापरी  वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर या शहरांशी जोडली जाईल. तर मुंबई-हैदराबाद कामशेत, पुणे,बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, हैदराबादशी जोडले जाणार आहे.

सर्वेक्षणाचे काम रेंगाळले

एरियल लिडार सर्वेक्षणामुळे जमिनीवरील अचूक माहिती प्रशासनाला मिळेल. नेमका प्रकल्प कोणत्या मार्गाने नेणे योग्य आहे, या मार्गात येणारे अडथळे, किती भूसंपादन करावे लागणार इत्यादी माहिती मिळेल. सध्या करोनामुळे या कामाला फारशी गती न मिळाल्याने सर्वेक्षणाचे काम रेंगाळले.

राज्यात २४ टक्केच भूसंपादन

आधीच मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भूसंपादनाच्या प्रक्रि येतच अडकला आहे. महाराष्ट्रात अवघे २४ टक्के पर्यंतच भूसंपान झाल्याने व वांद्रे कु र्ला संकु ल येथे स्थानक उभारणीसाठीही जागा उपलब्ध न झाल्याने प्रत्यक्षात काम मात्र सुरु झालेले नाही. तर वांद्रे कु र्ला संकु ल येथून सुरु होणारा २१ किलोमीटरचा भुयारी मार्गाच्या कामालाही सुरुवात झालेली नाही. त्या तुलनेत गुजरातमधील ९४ टक्के  आणि दिव-दमणमधील १०० टक्के  भूसंपादन होतानाच काही कामांना सुरुवात झाली. हा प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून चर्चेतच आहे.