वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना केंद्रामुळे जागा मिळण्यात अडचण
मुंबई : मुंबई – अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कु र्ला संकु लात (बीकेसी) उभारण्यात येणाऱ्या भूमिगत स्थानकासाठी अद्याप जागा मिळालेली नाही. जागा मिळेल या आशेपोटी या स्थानकाच्या उभारणीसाठी सादर झालेल्या निविदा फेब्र्रुवारीमध्ये उघडण्यात येणार होत्या. मात्र आता निविदा उघडण्यासाठी मे २०२१ चा मुहूर्त निश्चिात करण्यात आला आहे. परिणामी, या भूमिगत स्थानकाचे बांधकाम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील भूसंपादनाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. महाराष्ट्रात भूसंपादनाची प्रक्रि या धिम्या गतीने सुरू असून पालघरमध्ये १३ टक्के आणि ठाणे जिल्ह्यात ४४ टक्के असे, सरासरी राज्यात २३ टक्के च भूसंपादन झाले आहे. सर्वाधिक भूसंपादन दादरा- नगर हवेलीमध्ये १०० टक्के आणि गुजरातमध्ये ९४ टक्के झाले आहे. राज्यात भूसंपादन धिम्या गतीने होत असतानाच आता वांद्रे-कु र्ला संकु लात स्थानक उभारणीसाठीही जागेची अडचण येत आहे.
या भागात भूमिगत स्थानक उभारण्यात येणार असून त्यासाठी बोगद्याचे काम, स्थानक इमारत, तांत्रिक कामे केली जाणार आहे. स्थानक उभारणीसाठी १९ फे ब्रुवारी २०२१ ला निविदा खुली के ली जाणार आहे. ज्या ठिकाणी स्थानक उभारणार त्याच परिसरात करोना केंद्रही आहे. या के ंद्रामुळे स्थानक उभारणार कसे असा प्रश्न आहे. त्याशिवाय निविदाही खुली होऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईतील करोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे करोना के ंद्र पुन्हा सज्ज झाले आहे. सद्यस्थिती पाहता नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशने थोडी प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानक उभारणीसाठीची निविदा ५ मे २०२१ मध्ये उघडण्यात येईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
भूमिगत स्थानक
वांद्रे कु र्ला संकु ल येथे भूमिगत स्थानक उभारणीसाठी एक हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च आहे. ४.९ हेक्टर जागेत स्थानक उभारले जाणार आहे. १६ डब्यांच्या बुलेट ट्रेन गाड्यांसाठी सहा फलाट उभारले जातील. प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक असणार आहे.
वैशिष्ट्ये
- वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकातून बुलेट ट्रेन सुटताच ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती स्थानकातही थांबा दिला आहे.
- वांद्रे-कु र्ला संकुल ते बोईसर दरम्यान २१ किलोमीटर बोगद्यातून गाडी धावेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 12:12 am