28 September 2020

News Flash

VIDEO : शाळेची बस दुकानात शिरली, सुदैवाने जीवितहानी नाही

 बसचालकाने काढला पळ

(संग्रहित छायाचित्र)

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापूरात एका खाजगी शाळेची बस थेट दुकानात घुसली. बदलापूर पश्चिमेतील गणेश चौक भागात झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातादरम्यान बस चालक उडी मारून फरार झाला होता. घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते.

एक दिवसापूर्वी शाळेतील शिबिरादरम्यान एका मुलीचा डोंगरावरून घसरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बदलापूर पश्चिमेत एका शाळेची बस थेट दुकानात घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्लॉसम या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची ही बस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुपारी दीडच्या सुमारास विद्यापीठ रस्त्याच्या उतारावरून गणेश चौकात येताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. ताबा सुटल्याचे जाणवताच या चालकाने बसमधून उडी घेऊन पोबारा केला. मात्र शाळेची ही बस गणेश चौकात असलेल्या मंगलज्योत इमारतीतील पुजा साहित्य विक्रीच्या शिरली. सुदैवाने या घटनेती कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र या घटनेने बसमधील शाळेचे विद्यार्थी भयभीत झाले होते. स्थानिकांनी तातडीने या विद्यार्थ्यांना बसमधून उतरवत बाजूला केले.

या घटनेची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने दुकानाच्या शेजारी असलेल्या विजेच्या खांबामुळे आणि दुकानाला लावलेल्या लोखंडी जाळ्यांमुळे बस थांबली. त्यामुळे मोठा अपघात टळला. बसचा चालक नविन असल्याने त्याला वाहनावर नियंत्रण ठेवणे जमले नसल्याची माहिती आता मिळते आहे. मात्र बसची इमारतीला लागलेी धडक इतकी जोरात होती की इमारतीतील दुसऱ्या मजल्यापर्यंत याचे धक्के जाणवले. तसेच नेहमी वर्दळीच्या असलेल्या गणेश चौकातील रस्त्यावर कुणीही व्यक्ती नसल्याने मोठा अपघात टळला. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत बदलाापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 6:59 pm

Web Title: bus accident badlapur school bus
Next Stories
1 एक्स गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅट करताना रेकॉर्ड केला ‘तो’ व्हिडीओ आणि…
2 जावा मोटरसायकलनी मुंबईत उघडल्या चार शोरूम
3 प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशावर अमृता फडणवीस म्हणतात…
Just Now!
X