News Flash

‘बेस्ट’ संपाबाबत चर्चेतून मार्ग काढूया: उद्धव ठाकरे

‘बेस्ट’ संपाबाबत चर्चेतूनच मार्ग काढूया, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.

उद्धव ठाकरे

‘बेस्ट’ संपाबाबत चर्चेतूनच मार्ग काढूया, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. या संपात मला राजकारण करायचे नाही. मात्र, अवाजवी मागण्या केल्या तर आणखी समस्या निर्माण होतील, असे ठाकरे म्हणाले.

संपावर असलेल्या एकाही ‘बेस्ट’ कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या संपातून मार्ग निघणे गरजेचे असून आम्ही सर्वाशी चर्चा केली, मात्र मार्ग निघू शकला नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली.

बेस्टची आर्थिक स्थिती खराब आहे. ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचे आश्वासन मी दिले होते. ते नक्कीच पूर्ण करू असे सांगत एकत्रित बसून चर्चा केली तरच मार्ग निघेल असेही ते म्हणाले. बेस्टची तिजोरी रिकामी आहे. या संपात मला राजकारण करायचे नाही. मात्र अवाजवी मागण्या केल्या तर अजून समस्या निर्माण होतील, असेही ते म्हणाले.

‘खासगीकरण पर्याय नाही’

बेस्टचा तोटा मोठा असून जवळपास हजार बाराशे कोटी तोटा भरून काढण्यासाठी बेस्ट डेपोंचे खासगीकरण हा पर्याय असूच शकत नाही. खासगीकरणातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये उभे राहतील व त्यातून फारसा उपयोग होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. बेस्टचे खासगीकरण हा अंतिम पर्याय नसून कोणत्याही परिस्थितीत मालकी हक्क आम्ही गमावू देणार नाही. संपाचा निर्णय आता कोर्टाकडे असून अजूनही माझी गरज असेल तर चर्चेची आपली तयारी असल्याचे  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:45 am

Web Title: bus employees on strike in mumbai 2
Next Stories
1 लोकलच्या दरवाजांवर निळे दिवे
2 राष्ट्रवादीने प्रतिमा जपली!
3 आर्थिक दुर्बल आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी
Just Now!
X