News Flash

मुंबईत उद्यापासून सर्वसामान्यांसाठी ‘बेस्ट’ बससेवा सुरू!

लोकल प्रवास अद्याप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित

संग्रहीत छायाचित्र

मुंबईत उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्टची बसेसवा सुरू होत आहे. मात्र कोणत्याही बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नसतील. याशिवाय मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे. असं ‘बेस्ट’कडून कळवण्यात आलं आहे. मुंबईत लोकल प्रवास हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित राहणार असला, तरी बस मात्र १०० टक्के प्रवासी क्षमतेसह धावणार आहेत. परंतु, बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास असलेली मनाई कायम ठेवण्यात आली आहे.

याशिवाय, मुंबई, ठाण्यात मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. मात्र, दुकाने खुली ठेवण्याची वेळ ४ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, हॉटेल्समध्येही क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दोन दिवसांच्या गोंधळानंतर राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नवीन मार्गदशक तत्त्वे लागू केली. त्यानुसार करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायू खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे निर्बंध किती शिथिल करायचे याचा निर्णय दर आठवड्याला घेतला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Mumbai Unlock : महापालिकेकडून ‘ब्रेक द चेन’ मिशन अंतर्गत नियमावली जाहीर

ज्या विभागात करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण (पॉझिटिव्हिटी दर) ५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान आहे आणि प्राणवायूच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक खाटा रुग्णांनी व्यापलेल्या आहेत. अशा शहरांचा समावेश तिसऱ्या गटात करण्यात आला आहे. मुंबईत प्राणवायूच्या खाटांपैकी के वळ ३२.५१ टक्के खाटा भरलेल्या आहेत. मात्र करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५.५६ टक्के असल्यामुळे मुंबईचा समावेश तिसऱ्या गटात करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 5:47 pm

Web Title: bus services for general public will resume in mumbai tomorrow msr 87
Next Stories
1 पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल! हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार – प्रवीण दरेकर
2 मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनी केला गँगरेप
3 “तुम्ही नियम मोडले, तर आम्हालाही तो अधिकार”, खेड प्रकरणावरून संजय राऊतांचा राष्ट्रवादीला पुन्हा इशारा!
Just Now!
X