लोकल प्रवासाची मुभा नसल्याने कार्यालयात जाणे-येणे कठीण

मुंबई : मुंबईतील निर्बंध शिथिल झाल्यानंतर खासगी कार्यालये, दुकाने, हॉटेल आदी आस्थापने सुरू झाली आहेत. त्यामुळे नोकरदारांची गर्दी रस्त्यांवर वाढू लागली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने या प्रवाशांचा भार बसवाहतुकीवर येऊ लागला आहे. परिणामी शहरात विविध भागांत बसथांब्यांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यातच ‘बेस्ट’च्या सर्वच मार्गांवरील बस पहिल्या थांब्यावरूनच प्रवाशांनी भरून सुटत आहेत. उभ्याने प्रवास करण्यास मनाई असल्याने या बस अनेक थांब्यांवर थांबत नाहीत. त्यामुळे खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्या-जाण्यासाठीची परवड सुरूच आहे.

निर्बंध शिथिल झाल्याबरोबर सोमवारपासून खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. रस्त्यावरील प्रवाशांची गर्दीही वाढली आहे. मात्र सध्या लोकल प्रवासाची मुभा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खासगी वाहन अथवा बेस्ट बसचाच पर्याय उपलब्ध आहे. मात्र, बेस्टमध्येही उभ्याने प्रवासास परवानगी नसल्याने प्रवाशांना खूप वेळ ताटकळावे लागत आहे. बेस्ट बसवरील ताण वाढला आहे.

कार्यालयात जाण्यासाठी उपनगरांमधून प्रवासी निघत असल्याने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश बसगाड्या मंगळवारी सकाळच्या सुमारास भरून धावत होत्या. कार्यालये    सुरू होणे, नियम याबाबतचा संभ्रम मंगळवारी दूर झाल्यानंतर बस थांबे, खासगी वाहनांची गर्दी आणखी वाढली. आरंभ स्थानकातूनच बस भरून निघत असल्याने इतर थांब्यांवर प्रवाशांसाठी जागाच उपलब्ध नसल्याचे दिसून येत होते. छोट्या थांब्यांवर बसगाड्यात थांबवण्यात येत नव्हत्या. केवळ बसमधील प्रवाशांना उतरण्यापुरती आणि तेवढेच प्रवासी घेण्यापुरत्या बसगाड्या थांबवण्यात येत होत्या. त्यामुळे थांब्यांवर असलेल्या प्रवाशांच्या रांगा कासवाच्या गतीने पुढे सरकत असल्याचे दिसले.  परंतु दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने प्रवाशांना तासन्तास गाडीची वाट पाहत थांबण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे चित्र मंगळवारी दिसत होते.

बेस्ट प्रवाशांतही वाढ

बेस्ट बसमधून १०० टक्के  आसन क्षमतेने प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी देण्यात आली. उभ्याने प्रवासाची मुभा नाही. सोमवारी बसमधूनही प्रत्येक आसनावर दोन प्रवासी होते. उभ्याने प्रवासी नसल्याने आसन पकडताना प्रवाशांची तारांबळ उडत होती. ४ जूनला १६ लाख ८ हजार प्रवाशांनी प्रवास के ला होता. ७ जूनला १८ लाख १३ हजार प्रवाशांनी प्रवास के ला असून २ लाख पाच हजार अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास के ला आहे. प्रवासी वाढल्याने १ कोटी ९३ लाख रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. सोमवारी १ कोटी ५६ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

सारे प्रवासी रांगेत…

दादर, कुर्ला, सायन, वांद्रे आदी ठिकाणी सकाळच्या सुमारास प्रवाशांनी रांगा लावल्या होत्या. खोदादाद सर्कल येथून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी गाडीची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांची सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मोठी रांग लागली होती. सकाळी १२ वाजण्याच्या सुमारासही येथील थांब्यावर काही प्रवासी रांगेत होते. शिवाजीनगर सायन, चेंबूर येथून येणाऱ्या बहुतांश गाड्या भरून येत होत्या. त्यामुळे या थांब्यावरील एक-दोन प्रवाशांनाच गाडीत चढण्याची संधी मिळते. त्यामुळे येथून सुटणाऱ्या गाडीतही मर्यादित प्रवासी जाऊ शकतात. त्यामुळे सकाळी काही काळ मोठी रांग असते, असे थांब्यावरील ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्याने सांगितले.  सायंकाळी परतीच्या प्रवासातही असेच चित्र दिसत होते.

बेस्ट प्रवाशांतही वाढ

बेस्ट बसमधून १०० टक्के  आसन क्षमतेने प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी देण्यात आली. उभ्याने प्रवासाची मुभा नाही. सोमवारी बसमधूनही प्रत्येक आसनावर दोन प्रवासी होते. उभ्याने प्रवासी नसल्याने आसन पकडताना प्रवाशांची तारांबळ उडत होती. ४ जूनला १६ लाख ८ हजार प्रवाशांनी प्रवास के ला होता. ७ जूनला १८ लाख १३ हजार प्रवाशांनी प्रवास के ला असून २ लाख पाच हजार अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास के ला आहे. प्रवासी वाढल्याने १ कोटी ९३ लाख रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. सोमवारी १ कोटी ५६ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

एकाच दिवसांत ११ लाख प्रवाशांची भर

मुंबई: निर्बंध शिथिल होताच मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा तसेच बेस्ट बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. सोमवारी एकाच दिवसांत ९ लाख ९१ हजार लोकल प्रवाशांची, तर २ लाख पाच हजार बेस्ट प्रवाशांची भर पडली.

पश्चिम रेल्वेवर ३ जूनला सर्वाधिक ११ लाख ३८ हजार ५०७ प्रवाशांनी प्रवास के ला होता. तर ४ जूनला ही संख्या ९ लाख ६२ हजार होती. सोमवारी निर्बंध शिथिल झाल्यानंतर हीच प्रवासी संख्या १३ लाख ९२ हजार १५४ झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. ३ जूनशी तुलना के ल्यास सोमवारी २ लाख ५३ हजार प्रवासी वाढले आहेत. मध्य रेल्वेवर ही वाढ खूप मोठी आहे. ७ जूनला १९ लाख ३१ हजार ७४४ प्रवाशांनी प्रवास के ला होता. ४ जूनला ११ लाख ९२ हजार ९७७ प्रवाशांची नोंद झाली आहे.