मराठी पुस्तके जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथप्रदर्शनांच्या आयोजनात आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या ‘अक्षरधारा’ संस्थेने आता पुस्तकविक्री व्यवसायात नवा धमाका करण्याचे ठरवले आहे. ‘अक्षरधारा’च्या पुस्तक प्रदर्शनात एका पुस्तकाच्या खरेदीवर तीन पुस्तके मोफत मिळणार आहेत. पुण्यात २३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पुस्तक प्रदर्शनात हा नवा फंडा वापरण्यात येणार असून, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केल्या जाणाऱ्या पुस्तक प्रदर्शनातही ‘एका पुस्तकावर तीन पुस्तके मोफत’ ही योजना राबवली जाणार आहे.
‘अक्षरधारा’चे लक्ष्मण राठिवडेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, यंदा दसऱ्याला ‘अक्षरधारा’ने १९ वर्षे पूर्ण केली. आजवरच्या वाटचालीत प्रकाशक आणि वाचक यांचा खूप मोठा प्रतिसाद आणि सहकार्य  मिळाले. वाचकांचा प्रतिसाद पाहता मराठी वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, असे अजिबात वाटत नाही. मराठी वाचक, साहित्यप्रेमींकडून आजही पुस्तके विकत घेऊन वाचली जातात, फक्त तुम्ही ही पुस्तके त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी ‘अक्षरधारा’ने एका पुस्तकाच्या खरेदीवर एक मोफत तर गेल्या वर्षी एका पुस्तकाच्या खरेदीवर दोन पुस्तके मोफत अशी योजना राबवली होती. वाचकांकडून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदा ही नवी योजना आणली आहे.
२३ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रस्ता, पुणे येथे सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सुरू आहे. नंतर चिंचवड, कराड येथे आयोजित प्रदर्शनातही ही योजना असणार आहे.

या योजनेअंतर्गत किमान २५० ते ३०० रुपये तर कमाल दीड हजार रुपयांचे एक पुस्तक खरेदी केले की, वाचकाला त्यावर तीन पुस्तकांचासंच भेट म्हणून दिला जाईल. भेट मिळणारी पुस्तके निवडण्याची संधी वाचकांना नसेल. अगोदरच बांधणी केलेल्या तीन पुस्तकांचा संच त्यांना देण्यात येईल. समजा एखाद्या वाचकाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘शेलारखिंड’ हे ६०० रुपये किमतीचे पुस्तक खरेदी केले तर वाचकाला ऐतिहासिक विषयावरील तीन पुस्तके भेट मिळतील. म्हणजे वाचक ज्या साहित्यप्रकारातील (आरोग्य, कथा, कादंबरी आणि अन्य) एक पुस्तक खरेदी करेल, त्या विषयाशी संबंधित तीन पुस्तके त्याला मिळतील. भेट दिली जाणारी ही पुस्तके दर्जेदारच असतील.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन