News Flash

ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका; भुजबळांचा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी निवडणुकांची घोषणा केली. या निवडणुकीत ओबीसींसाठी आरक्षण राहणार नाही. त्यामुळे हा निर्णय ओबीसी नेत्यांसाठी धक्का मानला जातो.

जिल्हा परिषदेतील रद्द झालेल्या ओबीसी जागांवरील पोटनिवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. ह्या सर्व जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणुकांना विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भुमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषदेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. यावर भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशिवरून तत्कालीन सरकारवर आरोप केले. तसेच त्यानी फडणवीस सरकारच्या काळातील अध्यादेशाचा दाखला देत. केंद्र सरकारवर देखील टीका केली.

भुजबळ म्हणाले, “या निर्णयामुळे ५६ हजार पदं बाधित होत आहेत. तसेच केंद्राकडून इम्पेरीयल डाटा मिळत नाही. केंद्राच्या भुमिकेमुळे ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.” तसेच सध्या कोरोनाच्या संकटात निवडणुका कशा घेणार, असा प्रश्न देखील भुजबळ यांनी विचारला.

ओबीसी आरक्षणाशिवायच पोटनिवडणुका

ओबीसींचे आरक्षण पुनस्र्थापित झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या, यासाठी महाविकास आघाडीतील विजय वडेट्टीवार व छगन भुजबळ हे दोन मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आग्रही असतानाच मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने नागपूरसह पाच जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी निवडणुकांची घोषणा केली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत ओबीसींसाठी आरक्षण राहणार नाही. त्यामुळे आयोगाचा निर्णय सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांसाठी धक्का मानला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 11:48 am

Web Title: by elections without obc reservation bhujbal warning to seek redressal in supreme court srk 94
टॅग : Chagan Bhujbal,Obc
Next Stories
1 रायगड : लस घेतली, पण कुवैतमध्ये मान्यता नसलेली; गळफास घेऊन केली आत्महत्या
2 Maharashtra Unlock: जिल्ह्यांमधले निर्बंध, त्यांची वर्गवारी, सर्वकाही जाणून घ्या फक्त एका क्लिकवर!
3 “शरद पवारांच्या उपस्थितीत झालेला निर्णय रद्द; आपणच बॉस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”
Just Now!
X