भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील प्रवेश शुल्क वाढीला स्थायी समितीत विरोध करणाऱ्या भाजपच्या ‘पारदर्शकते’च्या पहारेकऱ्यांना बेसावध ठेऊन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका सभागृहात गुरुवारी शुल्कवाढीचा प्रस्ताव काही क्षणात मंजूर करवून घेतला. सभागृहात डुलक्या देत बसलेल्या ‘पारदर्शकते’च्या पहारेकऱ्यांना हा प्रस्ताव मंजूर झाला हे कळलेच नाही. त्यामुळे आता येत्या एक ऑगस्टपासून राणीच्या बागेतील प्रवेशासाठी प्रतिव्यक्ती ५० रुपये तर प्रत्येक कुटुंबाला १०० रुपये मोजावे लागणार आहेत. शुल्कवाढ लागू करण्यासाठी पालिका सभागृहाच्या मंजुरीची आवश्यकता होती. परंतु काँग्रेसने साथ सोडली तर भाजपचे नगरसेवक प्रस्ताव मंजूर करू देणार नाहीत, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांना वाटत होती. त्यामुळे तातडीचे कामकाज म्हणून सभागृहाच्या पटलावर असलेला हा प्रस्ताव बैठकीत पुकारण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका सभागृहाच्या गुरुवारच्या बैठकीत हा प्रस्ताव पुकारला आणि क्षणातच त्याला मंजुरी दिली. चर्चेविनाच हा प्रस्ताव मंजूर झाला.

राणीच्या बागेतील प्रवेश शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला, याची भाजप नगरसेवकांना कल्पनाच नव्हती. राणीच्या बागेतील शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे काही वेळाने कळल्यानंतरही भाजप नगरसेवक शांतपणे बसूनच होते. या संदर्भात भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना विचारणा केली असता, ‘हा प्रस्ताव पुकारला तेव्हा आपण हात वर केला होता. परंतु महापौरांनी बोलण्याची संधीच दिली नाही,’ असा दावा मनोज कोटक यांनी केला.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक
Panvel, sheva village, Air Force Station, Suspicious Individual, Arrests, Trespassing, Roaming, Restricted Area, marathi news
हवाई दलाच्या प्रवेश निषिद्ध परिसरात प्रवेश केल्याने गुन्हा दाखल

१ ऑगस्टपासूनचे प्रवेशशुल्क

  • १२ वर्षांवरील – ५० रुपये
  • ३ ते १२ वर्षे गटातील मुलांसाठी – २५ रुपये
  • कुटुंबासाठी (आई-वडिल, दोन मुले) – १०० रुपये
  • पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश
  • खासगी शाळेतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी – २५ रुपये
  • सकाळी ६ ते ८ पर्यंत मॉर्निगवॉक – मासिक १५० रु.
  • ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विनाशुल्क प्रवेश
  • १२ वर्षांवरील परदेशी पर्यटक – ४०० रुपये
  • ३ ते १२ वर्षे गटातील परदेशी मुले – २०० रुपये