भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील फ्लिपर या मादा पेंग्विननं पिलाला जन्म दिला आहे. नवीन पाहुण्याच्या आगमनानं आता इथल्या कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीदेखील ट्विट करत ही माहिती दिली आहे.

वाचा : पेंग्विनच्या पिल्लाचे नाव मीच ठेवणार..

फ्लिपर आणि मोल्ट या  जोडीचं हे पिल्लू आहे. भारतात प्रथमच एका पेंग्विनचा जन्म झाला आहे. पेग्विंन हे पक्षी अतिशय थंड प्रदेशात आढळतात. जुलै २०१६ मध्ये दक्षिण कोरियातून हम्बोल्ट प्रजातीच्या आठ पेंग्विनना राणीच्या बागेत आणण्यात आलं होतं. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. सात पैकी सहा पेंग्विनच्या जोड्या जुळल्या. फ्लिपरनं काही महिन्यापूर्वी अंडं दिलं होतं. त्यानंतर आळीपाळीनं फ्लिपर आणि मोल्ड हे दोघंही अंडी उबवत होते. पेंग्विनमध्ये संबंध आल्यानंतर साधारण महिनाभरात ते अंडी देतात. यानंतर ४० दिवसांनंतर अंड्यातून पिल्लू बाहेर येते.


सध्या डॉक्टर संजय त्रिपाठी आणि त्यांची टीम या पिल्लाची काळजी घेत आहेत.