News Flash

‘मुख्यमंत्री चषक’चा मुंबईत ‘युवा महासंगम’!

मुख्यमंत्री चषक क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेची राज्यस्तरीय अंतिम फेरी मुंबई, पुणे व अहमदनगर येथे  सुरू झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

५० हजार युवकांच्या मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चषक स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातील ४३ लाख मुला-मुलींपर्यंत पोहोचल्यानंतर आता स्पर्धेच्या राज्यस्तरीय परितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने रविवारी, ३ फेब्रुवारी रोजी मुंबईत युवा महासंगम आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यात ५० हजार युवक-युवतींची गर्दी जमवून भाजयुमो शक्तिप्रदर्शन करणार आहे.

मुख्यमंत्री चषक क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेची राज्यस्तरीय अंतिम फेरी मुंबई, पुणे व अहमदनगर येथे  सुरू झाली आहे. मुंबईत ३ फेब्रुवारी रोजी ५० हजार युवक-युवतींच्या सहभागाने युवा महासंगम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे, भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन, क्रीडामंत्री विनोद तावडे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत हा महासंगम होणार आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, आ. संतोष पाटील-दानवे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत १२ विविध प्रकारच्या खेळ व कला प्रकारात ४३ लाख स्पर्धकांचे आठ लाख सामने झाले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील २५ ते ३० हजार स्पर्धक सहभागी झाले, असे टिळेकर यांनी सांगितले. तर मुंबईत २ व ३ फेब्रुवारीला व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, कॅरम, अ‍ॅथलेटिक्स, रांगोळी, चित्रकला, गीत व नृत्य याच्या अंतिम स्पर्धा होतील. मुंबईत होणाऱ्या समारोप समारंभामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्य़ांतील ५० हजार युवक-युवती सहभागी होतील, असे भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:55 am

Web Title: c m chasak of maharashtra youth mahasangam
Next Stories
1 Railway Budget 2019 रेल्वे प्रकल्पांना अर्थसंकल्पातून बळ?
2 शाळांना पटसंख्येनुसार अनुदान
3 शिवसेना-भाजपमध्ये आता चित्रपटांवरून चढाओढ
Just Now!
X