News Flash

मुंबईकर रेल्वे प्रवाशांना मोदी सरकारचे गिफ्ट, ‘एमयूटीपी ३ ए’ प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

या प्रकल्पासाठी ३०,४८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

लोकसभा निवडणुकीआधीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खूशखबर दिली आहे.

लोकसभा निवडणुकीआधीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खूशखबर दिली आहे. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा-३ साठी मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी ३०,४८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पाअंतर्गत प्रवाशांची सुरक्षितता आणि सुखद प्रवासासाठी आपोआप उघडणाऱ्या दरवाज्यांसह वातानुकुलीत डब्यांचा समावेश आहे. यामुळे कॉरिडॉर निर्मिती आणि त्याचा विस्तार करून दूर अंतराच्या उपनगरी प्रवाशांचा सुखकर प्रवास होणार आहे.

या प्रकल्पा अंतर्गत स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी गर्दी आणि प्रवाशांची कोंडी कमी करण्यात प्रयत्न केला जाणार आहे. उपनगरी रेल्वेची क्षमता आणि सुरक्षितता वाढवणे. मध्य आणि पश्चिम रेल्वे वर उपनगरी रेल्वे कार्यान्वयनाचे विलगीकरण केले जाणार आहे.

सध्या मुंबई उपनगरी रेल्वे जाळ्यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 385 किमीचा मार्ग आहे. सकाळी कामावर जाण्याच्या आणि संध्याकाळी घरी परतण्याच्या ठराविक वेळी, उपनगरी गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. यावेळी क्षमतेच्या चौपट प्रवासी या गाड्यातून प्रवास करतात.

एमयूटीपी ३ ए अंतर्गत प्रस्तावित कामे…

– सीएसएमटी- पनवेल मार्गावर फास्ट एलिव्हेटेड कॉरिडोर
– मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल
– बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन
– पनवेल- विरार नवी उपनगरीय सेवा
– रेल्वे स्थानकांचे नुतनीकरण
– कल्याण-आसनगावदरम्यान चौथी लाईन
– गोरेगाव ते बोरिवली दरम्यान हार्बर मार्गाचा विस्तार
– कल्याण यार्ड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 5:32 pm

Web Title: cabinet approves mumbai urban transport project phase iiia
Next Stories
1 समुद्राच्या उधाणामुळे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत
2 ‘लोकसत्ता’ सहकारी बँकिंग परिषदेत समस्या, उपायांचा वेध
3 बुलेट ट्रेनच्या कामांना खीळ
Just Now!
X