दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची आता शंभर फूटांनी वाढवण्यात येणार आहे. आधी पुतळ्याची उंची अडीचशे फूट होती ती आता ३०० फूट करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयापूर्वी उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी २ जानेवारी रोजी आंबेडकर स्मारकाच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यानंतर स्मारकातील सर्व अडथळे दूर करुन १४ एप्रिल २०२२ पर्यंत म्हणजेच दोन वर्षात स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर स्मारकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा नवीन प्रस्तावही तयार करण्यात आला. तो बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि त्याला मान्यताही देण्यात आली.

dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Dr. Babasaheb Ambedkar and Kalaram Mandir Satyagraha
काळाराम मंदिर सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर झालेली दगडफेक, १९३० मध्ये ‘त्या’ दिवशी नेमके काय घडले होते?
Nana Patole Offers 2 Extra Seats to Vanchit Bahujan Aghadi from congress quota
वंचितला काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

स्मारकाचा खर्चही वाढणार

पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार असून आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता तो आता ९९० कोटींवर जाणार आहे.

इंदू मिलच्या १२५ एकरच्या जागी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. सन २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर सन २०१४ मध्ये राज्यात भाजपाचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या स्मारकासाठीच्या कामाच्या मंजुऱ्या आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तसेच ऑक्टोबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भुमिपूजन करण्यात आले. मात्र, अद्यापही स्मारकाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झालेली नाही.