विक्रीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

नाताळ साजरा करण्यासाठी ‘केक’ची हजेरी घराघरांत हवी असते त्यामुळे नाताळच्या पूर्वसंध्येपासूनच केकची मागणी वाढते हे खरे असले तरी सध्या नाताळपासून नववर्षांला निरोप देईपर्यंतचा आठवडा सेलिब्रेशनचा मूड सगळीकडे कायम असतो. त्यामुळे वर्षांअखेरीच्या या आठवडय़ात केकची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढली असल्याचे केक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. नाताळसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘प्लम’ केकपासून ते तोंडाला पाणी सुटेल अशा चविष्ट चॉकलेट केकपर्यंत आठवडाभर मुंबईतील सगळ्याच केकच्या दुकांनामधून मोठय़ा प्रमाणावर केकची विक्री होताना दिसते आहे.

नाताळच्या आधीपासूनच आमच्याकडे ‘प्लम’ केकसाठी जास्त मागणी असते. एरव्ही आमच्या दुकानातून हजार केकची विक्री होते मात्र नाताळच्या आठवडय़ात तीन ते चार हजार केकची विक्री दिवसभरात होते, अशी माहिती ‘हँग आऊट’ या खास के कसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या संचाल आहाना समतानी यांनी दिली. ‘हँग आऊट’ची केकची मोठी फॅक्टरी असून मुंबईत त्यांची ४५ दुकाने आहेत.

या सगळ्याच दुकानांमधून नाताळपासून नववर्ष उजाडेपर्यंत केकच्या विक्रीचा आलेख चढताच असतो, असे त्यांनी सांगितले. नाताळसाठी चार ते पाच महिने ‘रम’मध्ये भिजवलेले ड्रायफ्रूट्स वापरून तयार करण्यात येणाऱ्या ‘प्लम’ केकला सर्वात जास्त मागणी असते. मात्र त्यातही ‘प्लम’ केकचे काही वेगळे प्रकार आणि सांताक्लॉजचे ग्राहकांच्या मागणीनुसार बनवण्यात येणारे केक यांचा खप सर्वात जास्त असतो, असे समतानी यांनी सांगितले.

प्लम केक आणि येल लॉग केक ला या दिवसांमध्ये मोठी मागणी असते, अशी माहिती ‘सॅसी स्पून’कडून देण्यात आली. नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसासाठी खास बेल्जियम चॉकलेट केक, ब्लूबेरी चीज केक यांनाही मागणी असून या आठवाडय़ात केकच्या मागणीत ३० टक्के वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. नाताळ आणि नववर्षांनिमित्त केकच्या दरांमध्ये २० टक्के घट करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. नाताळच्या या आठवडय़ात केकसाठी मागणीनुसार पुरवठा या तत्त्वाने मोठय़ा प्रमाणावर केक बनवले जात असले तरी त्यांना फार काळ फॅक्टरीत ठेवता येत नाही, केक खराब होऊ नयेत म्हणून जास्त काळजी घ्यावी लागते, अशी माहिती समतानी यांनी दिली. चॉकलेट केक जास्तीत जास्त दोन  दिवस तर क्रीम केक तयार केल्यानंतर दीड दिवसांच्या आत ग्राहकांना दिला जातो, असेही त्या म्हणाल्या.

नाताळसाठी म्हणून ‘ख्रिसमस एक्स-मास ट्री फौडन्ट प्लम केक’ बाजारात आणले असून त्यांना ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. वर्षभरामध्ये जेवढय़ा प्लम केकची विक्री होते तेवढे केक या एका आठवडय़ात ग्राहकांकडून खरेदी केले जातात.

संतोष शेट्टी, ब्रॅण्ड प्रमुख, रिबन अ‍ॅण्ड बलून्स

नववर्षांनिमित्त सध्या बाजारात चॉकलेट केकच्या मागणीत वाढ झाली असून ‘डच ट्रफल चॉकलेट केक’ या काहीसा गोड आणि कडवट चव मिक्स असलेल्या केकला सर्वाधिक मागणी आहे. या आठवडय़ात केकची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे.

संजय काकडे, साहाय्यक व्यवस्थापक, ‘कामदार