News Flash

साखरपुडयाच्या पार्टीसाठी बोलवून मैत्रिणीवर मित्रांनीच अंधेरीतल्या हॉटेलमध्ये केला सामूहिक बलात्कार

पार्टीला आलेल्या अन्य दोन मैत्रिणी थोडयावेळाने तिथून निघून गेल्या.

(संग्रहित छायाचित्र)

विश्वास हा मैत्रीच्या नात्याचा पाया असतो. पण मुंबईत काही युवकांनी या मैत्रीच्या नात्याला कलंक लावला. मैत्रिणीला साखरपुडयाच्या पार्टीसाठी म्हणून बोलवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलमध्ये मागच्या आठवडयात ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणीने १५ नोव्हेंबरला तीन आरोपींविरोधात तक्रार नोंदवली. आरोपींनी आपल्याला व अन्य दोन महिलांना पार्टीसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर आरोपींनी आपल्यावर बलात्कार केला असे पीडित तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

तीन आरोपींपैकी एकाने त्याच्या साखरपु़डयाच्या निमित्ताने आठ नोव्हेंबरला ही पार्टी आयोजित केली होती, असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. महिलेच्या तक्रारीनुसार, मुख्य आरोपीने तिला दारु पिण्यासाठी जबरदस्ती केली. पार्टीला आलेल्या अन्य दोन मैत्रिणी थोडयावेळाने तिथून निघून गेल्या. पण मुख्य आरोपी आणि दोन मित्र तिथेच थांबले होते. त्यांनी हॉटेलमधल्या खोलीत बलात्कार केला. पीडित महिला घरी पोहोचल्यानंतर तिने लगेच याबद्दल कुटुंबीयांना काही सांगितले नाही. पण अखेर तिने हिम्मत करुन शनिवारी कुटुंबीयांना तिच्यासोबत काय घडले? ते सांगितले.

कुटुंबीय तिला लगेच तक्रार नोंदवण्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेले. ही तक्रार नंतर सहार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. कारण गुन्हा घडला, ते हॉटेल सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. “आरोपी फारर असून आम्ही लवकरच त्यांना अटक करु. वैद्यकीय तपासणीसाठी पीडित महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आले. आम्ही रिपोर्टची वाट पाहत आहोत” असे सहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:38 pm

Web Title: call for engagement party woman gangraped by friends at andheri hotel dmp 82
Next Stories
1 बाळासाहेबांचं स्मारक की मातोश्री तीन?; मनसेचा सवाल
2 प्रेयसीचा गळा चिरला, त्यानंतर स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडला, मालाडमधली धक्कादायक घटना
3 मंदिरे उघडण्यावरून राजकारण
Just Now!
X