आपल्या सदनिकांवर कारवाई करण्याविरोधात कॅम्पाकोला वासियांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज(मंगळवार) फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे आता कॅम्पाकोला वासियांच्या सर्व आशा संपुष्टात आल्याची चिन्हे आहेत.
कॅम्पा कोलाच्या निमित्ताने..
कॅम्पाकोला कम्पाऊंडमधील सदनिकाधारकांना घरे रिकामी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आणि मुंबई महानगरपालिकेने दिलेली मुदत सोमवारी संपली. मात्र रहिवाशांनी मागील आठवड्यात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात कारवाईकरण्याविरोधात याचिका दाखल केली होती. आता ही याचिका देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
कॅम्पाकोला वासियांनी दाखल केलेली याचिकेचा संदर्भ चुकीचा आणि वैध नसल्याने याचिका फेटाळून लावण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे  न्यायाधीश जे.एस.खेहार आणि सी.नागाप्पन यांच्या खंडपीठीने सुनावणी दरम्यान नमूद केले आहे.
कॅम्पाकोला वासियांना पालिकेने दोन जूनपर्यंत चावी परत करण्याची मुदत दिली होती, तरी सोमवारीही रहिवाशांनी चाव्या दिल्या नाहीत. त्यामुळे पालिकाही कॅम्पा कोलावासियांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची अटकळ निर्माण झाली होती.