पाच मजले अधिकृत असल्यामुळे कॅम्पा कोलातील अनधिकृत मजल्यांच्या जलजोडण्या तोडण्यात अडथळा येत असून ही कारवाई आणखी एक दिवस वाढविण्याचा निर्णय महापालिकेने मंगळवारी घेतला. त्यामुळे कॅम्पा कोलामध्ये गुरवापर्यंत कारवाई सुरू राहणार आहे.
रहिवाशांच्या विरोधामुळे वरळी येथील कॅम्पा कोलातील अनधिकृत सदनिकांवर पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करता येत नव्हती. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मदतीचे आश्वासन देताच रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांना आत प्रवेश दिला. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी कारवाईस सुरुवात केली. कॅम्पा कोलामध्ये एकूण तीन दिवस कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार मंगळवारी दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरूच होती. दिवसभरात पालिकेने ९० अनधिकृत सदनिकांचा वीजपुरवठा तोडला. तसेच ४५ घरांचा गॅसपुरवठा आणि २५ घरांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला. अनधिकृत सदनिकांच्या जलजोडण्या तोडण्यात अडथळे येत असल्यामुळे आता आणखी एक दिवस कारवाई करावी लागणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 12:05 pm