07 March 2021

News Flash

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करू शकतो, पण…; मध्य रेल्वेनं दिली महत्त्वाची माहिती

लोकल सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेचे महा व्यवस्थापक संजीव मित्तल काय म्हणाले?

(संग्रहित छायाचित्र)

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दरवाजे कधी उघडणार हा प्रश्न गेल्या कित्येक महिन्यांपासून विचारला जात आहे. उच्च न्यायालयातही याप्रकरणी सुनावणी सुरू असून, लोकलच्या निर्णयाचं भिजत घोंगडे कायम आहे. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लोकल सेवा सुरू करण्यास मध्य रेल्वे सज्ज असल्याचं सांगत अधिकाऱ्यांनी कारणांचा उलगडा केला आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबद्दल इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. मात्र यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहे. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे राज्य सरकारला काळजी वाटते आणि त्यामुळे राज्यात पुन्हा रेल्वेगाड्या सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे.

मध्य रेल्वेने एक किंवा इतर पर्यायांनी गाड्या सुरू केल्या आहेत आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासाची मूभा दिल्यानंतर लवकरच पूर्ण क्षमतेने लोकल धावतील. लॉकडाउन होण्याआधी मध्य रेल्वेकडून १७७४ लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्यापैकी काही बंधनं पाळून १५८० गाड्या पुन्हा धावत सुरू करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारबरोबर रेल्वेचा चांगला समन्वय आहे. हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी पर्याय स्वीकारण्यात आले आहेत. मुंबईतील लोकल रेल्वेबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत २० श्रेणीतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास मध्य रेल्वे सज्ज आहे. राज्य सरकारकडून परवानगी येताच लोकल सुरू केल्या जाईल,” असं मित्तल यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 9:10 am

Web Title: can resume suburban trains for public central railways bmh 90
Next Stories
1 यंदाच्या अर्थसंकल्पाचा वेध
2 चार दिवसांच्या सुट्टीमुळे पर्यटनस्थळांकडे धाव
3 वैद्यकीय प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविण्यास विरोध
Just Now!
X