News Flash

काँग्रेसकडून उमेदवारीचा प्रस्ताव होता : खडसे

हे करोना संकट दूर झाल्यावर नेते व कार्यकर्ता यांच्याशी चर्चा करून ठरवेन

भाजपने जरी उमेदवारी नाकारली असली तरी काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव होता. मी तो नाकारला. भाजपचे सहा— सात आमदार मला मतदान करण्यास तयार होते, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला.

यापुढील काळात कोणता निर्णय घ्यायचा, हे करोना संकट दूर झाल्यावर नेते व कार्यकर्ता यांच्याशी चर्चा करून ठरवेन, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेचे उमेदवार आधीच निश्चित झाले होते हे उमेदवारांच्या शपथपत्रकांच्या मुद्राकांवरील तारखांवरून स्पष्ट होते, असा आरोप खडसे यांनी के ला. मात्र खडसे यांचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फे टाळून लावला.  मुद्रांक  ज्या तारखेला कोषागारातून  विकत घेतले ती तारीख मार्चची असली तरी शपथपत्रे मेमध्येच केली आहेत. प्रदेश सुकाणू समितीने आठ नेत्यांची नावे पाठविली, तरी केंद्रीय नेतृत्वाने नवीन नावे पाठविण्याची सूचना केल्याने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी मिळणार नाही, हा अंदाज आला होता. या उमेदवारांची नावे पाठवून शपथपत्रे तयार ठेवण्याची व मुंबईत येण्याची सूचना ८ मेच्या दरम्यान त्यांना दिली. उमेदवारी निश्चित नाही, केंद्रीय नेते निर्णय घेतील, याची कल्पना देण्यात आली. त्यानुसार ४ उमेदवारांची घोषणा केंद्रीय नेत्यांनी केली, असे पाटील म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:34 am

Web Title: candidature was proposed by the congress eknath khadse abn 97
Next Stories
1 मजुरांसह छोटे व्यावसायिकही गावाकडे
2 राज्यातील १७ हजार कैद्यांची सुटका
3 प्राधान्य करोनाविरोधी लढय़ाला की विधिमंडळ कामकाजाला?
Just Now!
X