उच्चशिक्षित तरुणासह दोघांना अटक

मुंबई : डोंबिवलीतील ‘पलावा सिटी’ या निवासी संकुलात जमीनविरहित किंवा फक्त पाणी आणि कार्बन वायूआधारे (हायड्रोपोनिक) सुरू असलेली गांजाची शेती एनसीबीने उद्ध्वस्त के ली. या कारवाईत अटक झालेला अर्शद खत्री उच्चशिक्षित (मरिन बायोलॉजीस्ट) असून अशा प्रकारच्या शेतीतील तज्ज्ञ आहे. अ‍ॅमस्टरडॅम, नेदरलॅण्ड्स येथून डार्क वेबआधारे बियाणे विकत घेऊन अर्शदने पलावा सिटीतील नातेवाईकाच्या घरात आतापर्यंत गांजाची चार पिके  घेतली. हा गांजा मुंबई, पुण्यात ८० हजार रुपये तोळा या भावाने विकला जातो.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवडय़ात दोन तरुणांना परदेशी गांजासह अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून पलावा सिटीतील जमीनविरहित गांजा शेती आणि ती करणाऱ्या आरोपींबाबत माहिती मिळाली. त्याआधारे छापा घालून अर्शदसह जावेद शेखला अटक करण्यात आली. हे घर रेहान खान या तरुणाचे आहे. रेहान सध्या अरब देशांमध्ये स्थायिक असून त्याने अर्शदला गांजा शेतीसाठी अर्थसहाय्य के ल्याचे स्पष्ट झाले. रेहानच्या घरात जमीनविरहित शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री, पीएच रेग्युलेटर, पाण्याचे पंप, कार्बन वायूचे सिलिंडर, अद्ययावत प्रकाश योजना, हवा खेळती ठेवण्यासाठी के लेली व्यवस्था आदी यंत्रणा आढळली. या कारवाईत सुमारे एक किलो परदेशी गांजा जप्त करण्यात आला. अर्शदने या घरात गांजाची चार पिके  घेतल्याची माहिती एनसीबीला मिळाली. अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी जावेद अमली पदार्थ विक्रेता आहे. सध्या परदेशी गांजा किं वा हायड्रोपोनिक पद्धतीने पिकवलेल्या गांजाची मागणी वाढली आहे. अर्शदला एक ग्रॅम गांजा उत्पादित करण्यासाठी अडीच हजार रुपये खर्च येत होता. तर बाजारात त्याची आठ हजार रुपयांना विक्री होत होती.अर्शदने पीक घेतल्यावर जावेद व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅटद्वारे ग्राहकांशी बोलत असे.