News Flash

तराफ्याचे कप्तान राकेश बल्लव यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट

दोन आठवड्यांपूर्वी बल्लव कुटुंब जे.जे. रुग्णालयात मृतदेहाची ओळ्ख पटविण्यासाठी आले होते.

तराफ्याचे कप्तान राकेश बल्लव यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट

मुंबई : पी ३०५ तराफ्याचे कप्तान राकेश बल्लव यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे अखेर डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले. जे.जे. रुग्णालयातील ओळख न पटल्याने बेवारस अवस्थेत पडलेल्या एक मृतदेहाचा डीएनए बल्लव यांच्या मुलाशी जुळल्याची माहिती येलो गेट पोलिसांनी दिली.

दोन आठवड्यांपूर्वी बल्लव कुटुंब जे.जे. रुग्णालयात मृतदेहाची ओळ्ख पटविण्यासाठी आले होते. तेव्हा एक मृतदेह बल्लव यांचा असावा, असा अंदाज कुटुंबाने व्यक्त केला. मात्र कुटुंबाने खात्री न दिल्याने पोलिसांनी निव्वळ अंदाजावर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात न देण्याचा निर्णय घेतला. डीएनए चाचणीसाठी त्यांच्या मुलाचा नमुना घेत तो चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला. प्रयोगशाळेने तराफा अपघात घडल्यानंतर नौदलाने शोधलेल्या मृतदेहांपैकी एकाशी बल्लव यांचा डीएनए जुळल्याचे पोलिसांना कळवले. मात्र हा मृतदेह बल्लव यांचाच आहे का याबाबत अद्यापही खात्री नसल्याचे कुटुबीयांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 1:48 am

Web Title: captain raft rakesh ballav died accident akp 94
Next Stories
1 बस अपघातात दुखापत झालेल्या महिलेला २३ लाखांची भरपाई
2 आजारी व्यक्ती, काळजीवाहूंसाठी उपक्रम
3 समाजमाध्यमांवर पोलिसांचा भावुक संदेश
Just Now!
X