बोरीवलीत चिकुवाडी परिसरात उच्च दाबाची पाईपलाइन फुटल्यानं संपूर्ण परिसर जलमय झाला होता. रस्त्यावर पाणी साचल्यानं आजूबाजूच्या परिसरातील लोक रस्त्यावर आले होते. पाण्याचा दाब इतका प्रचंड होता की पाण्याच्या दाबामुळे मॅनहोलवर पार्क केलेली एक गाडी काही फूट उंच हवेत उसळली.

सुदैवानं या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. पाईपलाइन फुटल्यानं संपूर्ण परिसर जलमय झाला होता. पाण्याच्या दाबामुळे पिकअप गाडी हवेत उडाली. हे दृश्य पाहून स्थानिकांनी घाबरून पळापळही केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील गाड्यांच्या काचादेखील फुटल्या. काही गाड्यांचं याहून अधिक नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत चार गाड्या, दोन दुचाकीचंही नुकसान झालं आहे. पेव्हर ब्लॉकही तुटले असून रस्त्याच्या कडेला असलेली काही झाडं देखील उन्मळून पडली आहेत.

पालिकेतर्फे सदर जलवाहिनीचे दुरुस्ती करणाचे काम सुरु आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी दिली आहे.