20 September 2020

News Flash

बोरिवली कारशेडमध्ये महिलेची प्रसूती

रेल्वेमध्ये महिला प्रसूत होण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. माया बेलल या गर्भवती महिलेने गुरुवारी रात्री रेल्वेच्या बोरिवलीतील कारशेडमध्ये बाळाला जन्म दिला.

| June 13, 2015 04:30 am

रेल्वेमध्ये महिला प्रसूत होण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. माया बेलल या गर्भवती महिलेने गुरुवारी रात्री रेल्वेच्या बोरिवलीतील कारशेडमध्ये बाळाला जन्म दिला. ती नालासोपारा येथील रहिवासी आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ती प्रसूतीसाठी कांदिवलीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात जाण्यासाठी आपल्या सासूसोबत निघाली होती. तिने बोरिवली लोकल पकडली होती. बोरिवली स्थानक आल्यावर ती लोकल कारशेडमध्ये जाण्यास निघाली. त्या वेळी मायाला प्रसूतिवेदना सुरू झाल्या आणि कारशेडमध्येच तिने बाळाचा जन्म दिला. दरम्यान, गस्तीवरील रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णावाहिका मागवली आणि मायाला रुग्णालयात दाखल केले. माया आणि तिच्या बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 4:30 am

Web Title: car shed
Next Stories
1 बस दरीत कोसळून दोन ठार
2 सागरी मार्ग पालिकेकडून; सेनेचा निर्धार
3 राज्यात पोलिसांची ‘घर घर’ संपणार!
Just Now!
X