19 September 2020

News Flash

व्यंगचित्रकारात जुलमी राजवट उलथवण्याची धमक – राज ठाकरे

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ट्विटरच्या माध्यमातून व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा देतानाही त्यांनी आपला खास अंदाज कायम राखला आहे.

संग्रहित छायाचित्र

व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून राजकीय फटकारे ओढले आहेत. जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ट्विटरच्या माध्यमातून व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा देतानाही त्यांनी आपला खास अंदाज कायम राखला आहे.

आज जागतिक व्यंगचित्रकार दिन ह्या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका, असे राज यांनी ट्विट केले आहे. लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत राज्यभरातील सभांद्वारे राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप सरकारवर आपल्या खास शैलीत सातत्याने टीका केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज हे देखील उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहेत. आपल्या कुंचल्यातून ते नियमितपणे राजकीय भाष्य करत असतात. त्यांनी या ट्विटसोबत व्यंगचित्र रेखाटतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. तसेच देशाला तुमच्या प्रतिभेची आज सगळ्यात जास्त गरज आहे, असे व्यंगचित्रकारांना उद्देशून म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 5:37 pm

Web Title: cartoonist has strenght to destroy tyrannical system says raj thackeray
Next Stories
1 अंधेरीत सिलिंडर स्फोटानंतर इमारतीला आग, आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू
2 दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष -पवार
3 प्लास्टिक कारवाईवरील दंडाची रक्कम कायम
Just Now!
X