News Flash

अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल

खार पोलीस ठाण्यात महापालिकेकडून एफआयआर दाखल

संग्रहीत फोटो

अभिनेता अरबाज खान, सोहेल खान व सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान यांच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे.

२५ डिसेंबर रोजी हे तिघेही यूएईवरून मुंबईत परतले होते. मात्र मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बुकींग असल्याचं सांगून ते परस्पर घरी निघून गेले होते. एकीकडे करोनाचं नवं संकट येत असताना, बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून अशा प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात आल्याचं समोर येत आहे.

नव्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार ब्रिटन व यूएईवरून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात रहावं लागतं. त्यानुसार त्यांचं बुकींग हे ताज लॅण्डमध्ये करण्यात आलं होतं. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी महापालिकेने जेव्हा आढावा घेतला, तेव्हा ते तिघे तिथं गेलेच नसल्याचं समोर आलं. हे तिघे परस्पर घरी गेल्याचं उघडकीस आलं होतं. त्यामुळे आता मुंबई महापालिकेकडून त्यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

विमानतळावरून नियमांचा भंग करून परस्पपर घरी पळून गेल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. याप्रकरणी आता या तिघांना भायखाळाच्या रिचर्डसन अँड क्रूडास येथील क्वारंटाईन  क्वारंटाईन सेंटरला सुद्धा नेण्यात येणार आहे. ९ जानेवारीपर्यंत त्यांना तिथं ठेवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 8:55 pm

Web Title: case filed against arbaaz khan sohail khan nirvana khan msr 87
Next Stories
1 अक्षय कुमारचे बँक खाते आणि अमिताभ याच्या कपाटातील कपड्यांवर ‘या’ अभिनेत्याची नजर
2 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मध्ये प्रिया मराठेची एण्ट्री
3 Video : नवीन वर्ष, नवा संकल्प! हृतिक शिकतोय ‘ही’ गोष्ट
Just Now!
X