News Flash

दिग्दर्शकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अभिनेत्रीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

काही दिवसांनी या अभिनेत्रीच्या मित्राने दिग्दर्शकाशी संपर्क साधला आणि तिचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली

प्रतिकात्मक छायाचित्र

बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वेबमालिका दिग्दर्शकाकडून एक लाख ७० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका अभिनेत्रीसह तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  या दिग्दर्शकाला वेबमालिकेसाठी अभिनेत्रीची गरज होती. एका मध्यस्थाच्या माध्यमातून त्याची या अभिनेत्रीशी ओळख झाली. कांदिवली परिसरात वेबमालिकेच्या ऑडिशननिमित्त त्या दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांनी परस्परसंमतीने शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनी या अभिनेत्रीच्या मित्राने दिग्दर्शकाशी संपर्क साधला आणि तिचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. तसेच दिग्दर्शकाकडे चार लाख रुपयांची खंडणी मागितली.  गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने हा दिग्दर्शक आरोपींना भेटण्यासाठी घाटकोपर येथे गेला. या वेळी अभिनेत्री, तिचा मित्र आणि अन्य दोघे त्याच्या वाहनात जबरदस्तीने बसले. त्यांनी त्याला चाकूचा धाक दाखवून घाटकोपर, सायन परिसरांत फिरविले. या वेळी त्यांनी दिग्दर्शकाच्या भ्रमणध्वनीवरून ऑनलाइन पद्धतीने चार लाख रुपये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ते दीड लाख रुपये हस्तांतरित करू शकले. त्यांनी दिग्दर्शकाला एटीएम सेंटरमधून आणखी २० हजार रुपये काढण्यास सांगून सगळे पैसे घेऊन फरार झाले. याप्रकरणी पंतनगर पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:42 am

Web Title: case has been registered against three persons including the actress for extorting ransom from the director abn 97
Next Stories
1 गरज आणि करबचतीच्या समन्वयातून गुंतवणूक करा!
2 पालिकांच्या महासभा तूर्त आभासीच
3 वीज सवलतीसाठी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Just Now!
X