15 July 2020

News Flash

वसतिगृहबाह्य विद्यार्थ्यांना निवासासाठी तालुकास्तरावर रोख रक्कम

शिक्षणासाठी शहरांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी घरे भाडय़ाने घेऊन राहणे परवडत नाही.

संग्रहित छायाचित्र

मुंबई: शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळणाऱ्या ११ वी व त्यापुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी मोठी शहरे व जिल्ह्य़ाच्या मुख्यालयांत राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या माध्यमातून निवासापोटी रोख रक्कम दिली जाते. आता त्याची  व्याप्ती वाढविण्यात आली असून, तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी

दिली.   ग्रामीण भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी घरे भाडय़ाने घेऊन राहणे परवडत नाही. . त्याचा विचार करून, वेगवेगळ्या समाज घटकांसाठी वर्षांला निवासापोटी विशिष्ट रक्कम देण्याच्या स्वतंत्र योजना सुरू करण्यात आल्या. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार ही योजना सुरू करण्यात आली.  सध्या  मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, ठाणे आदी मोठय़ा शहरांमध्ये वार्षिक ६० हजार रुपये, तसेच महसुली विभाग, क वर्ग महानगरपालिका या ठिकाणी वार्षिक  ५१ हजार रुपये आणि इतर जिल्ह्य़ांच्या ठिकाणी वार्षिक ४३ हजार रुपये इतकी रक्कम या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 3:27 am

Web Title: cash at taluka level for accommodation of students outside the hostel zws 70
Next Stories
1 सॅनिटायझरची विक्री औषध दुकानांमध्येच करणे बंधनकारक
2 राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा
3 ‘करोनापश्चात ग्राहक आणि ग्राहक चळवळ’ या विषयावर वेबिनार
Just Now!
X