News Flash

हिंदू सरकार सत्तेत येऊनही हिंदुंचा छळ थांबलेला नाही- अभय वर्तक

भाजप सरकारच्या आश्रयाने हे सगळे घडत आहे.

Abhay vartak : दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास लावण्यात अपयश येत आल्यामुळे त्यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता. कोणी मिळाले नाही की पोलीस सनातनच्या साधकांना पकडतात, असा आरोप यावेळी अभय वर्तक यांनी केला.

सीबीआयकडे कोणतेही ठोस पुरावे नसताना केवळ सनातन संस्थेची बदनामी करण्यासाठी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला अटक करण्यात आल्याचा आरोप शनिवारी सनातन संस्थेकडून करण्यात आला. हिंदू राष्ट्राचा आग्रह धरणाऱ्या सनातन संघटनेला नष्ट करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचे यावेळी संस्थेचे प्रवक्ते अभवय वर्तक यांनी सांगितले. पोलिसांना या हत्याप्रकरणाचा तपास लावण्यात अपयश येत आल्यामुळे त्यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता. कोणी मिळाले नाही की पोलीस सनातनच्या साधकांना पकडतात, असा आरोपही यावेळी अभय वर्तक यांनी केला. काँग्रेसच्या काळात जो छळ सुरू होता, जो षडयंत्राचा अनुभव येत होता, तोच अनुभव आता सत्ताबदलानंतर येत आहे याचे खूप दु:ख होत आहे. भाजप सरकारच्या आश्रयाने हे सगळे घडत आहे. हिंदुंचे सरकार आले तरी हिंदुंचा छळ थांबलेला नाही. स्युडो सेक्युलर लोकांना खुश करण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचे अभय वर्तक यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.
सनातन ही दहशतवादी संघटना – आशिष खेतान 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 6:24 pm

Web Title: cbi arrest virendra tawde to malgin sanatan sanstha
टॅग : Cbi
Next Stories
1 मोदी आयत्या बिळात नागोबा, शिवसेनेचा भाजपवर पलटवार
2 सनातन ही दहशतवादी संघटना – आशिष खेतान
3 मुंबईत पावसाचे आगमन, तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक मंदावली
Just Now!
X