News Flash

डिजिटल पुरावा उपलब्ध करण्याची सीबीआयची मागणी फेटाळली

या प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून मुंबई पोलिसांनी हा डिजिटल पुरावा मिळवला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

फोन टॅपिंग प्रकरण

मुंबई : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने डिजिटल स्वरूपातील पुरावा हस्तगत केला आहे. हा पुरावा उपलब्ध करण्याचे आदेश देण्याची सीबीआयची मागणी कनिष्ठ न्यायालयाने फेटाळली.

तपास चौकशी वा खटल्यासाठी आवश्यक असलेले आणि तपास अधिकाऱ्याच्या ताब्यात असलेले पुरावे सादर करण्याचे आदेश महादंडाधिकारी देऊ शकतात. हे आदेश देण्याचा अधिकार फौजदारी दंडसंहितेच्या कलम ९१नुसार महानगरदंडाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे या प्रकरणीही महानगरदंडाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून मुंबई पोलिसांना फोन टॅपिंगप्रकरणी गोळा केलेले डिजिटल पुरावे सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सीबीआयतर्फे करण्यात आली.

मुंबई पोलिसांनी या मागणीला विरोध केला. या प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून मुंबई पोलिसांनी हा डिजिटल पुरावा मिळवला आहे. तसेच हा पुरावा विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. शिवाय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची मर्यादा ओलांडून सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर महानगरदंडाधिकाऱ्यांनी सीबीआयची मागणी फेटाळली. तसेच मागणी का फेटाळली याचा सविस्तर आदेश नंतर देण्याचे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:20 am

Web Title: cbi demand for providing digital evidence was rejected akp 94
Next Stories
1 लशीअभावी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी!
2 ‘आरक्षणाच्या मर्यादेवर केंद्राकडून ठाम भूमिकेची अपेक्षा’
3 नेते- अभिनेत्यांकडे रेमडेसिविरचा साठा कसा?
Just Now!
X