News Flash

राज्यात सीबीआयला चौकशीस परवानगी नाही, पण…

दिल्ली पोलीस कायद्यानुसार सीबीआयला कोणत्याही राज्यात चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकारकडून विविध यंत्रणांचा दुरुपयोग के ला जात असल्याच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर राज्यात केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असले तरी परमबीर सिंह यांच्या आरोपांच्या चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने सीबीआय पूर्वपरवानगीशिवाय चौकशी करू शकेल.

दिल्ली पोलीस कायद्यानुसार सीबीआयला कोणत्याही राज्यात चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते. प्रत्येक प्रकरणात चौकशीची परवानगीसाठी यावे लागू नये म्हणून राज्य सरकारकडून सीबीआयला ठरावीक कालावधीसाठी चौकशीची परावनगी दिली जाते. मध्यंतरी केंद्र सरकारकडून विविध यंत्रणांचा दुरुपयोग के ला जात असल्याचा आरोप विरोधकांनी के ला होता. यानंतर बिगरभाजपशासित राज्यांनी सीबीआय चौकशीची परवानगी रद्द के ली. यामुळे कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र, पश्चिाम बंगालसह काही राज्यांमध्ये सीबीआयला राज्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशीची परवानगी रद्द के ली असली तरी परमबीर सिंहप्रकरणी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने सीबीआयला राज्यात चौकशी करता येऊ शके ल.

सीबीआयला राज्यात चौकशीसाठी परवानगी नसली तरी अनिल देशमुख विरुद्ध परमबीर सिंह प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचा आदेश सीबीआयला दिला आहे. परिणामी सीबीआय राज्याच्या परवानगीविना चौकशी करू शके ल.

– वाय. पी. सिंग, माजी पोलीस अधिकारी आणि वकील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:39 am

Web Title: cbi is not allowed to investigate in the state but will be by court order abn 97
Next Stories
1 चौकशीतून अन्य नेत्यांचीही नावे उघड होतील!
2 सर्वच रुग्णालयांतील अग्निसुरक्षा तपासणीचे आदेश
3 कठोर निर्बंधांवर नाराजी
Just Now!
X