केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावी आणि बारावीच्या सर्व विषयांच्या परीक्षांऐवजी फक्त पुढील प्रवेशासाठी महत्वाच्या असलेल्या विषयांच्याच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सोडून इतर राज्यातील दहावीची राहिलेल्या विषयांची परीक्षा घेण्यात येणार नाही, तर बारावीच्या राहिलेल्या १२ विषयांचीच परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार असून पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावाची भीती आणि टाळेबंदीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ सीबीएसईवर आली. दहावी आणि बारावीच्या १८ मार्चनंतरच्या सर्व परीक्षा मंडळाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राहिलेल्या परीक्षांपैकी महत्वाच्या आणि पुढील प्रवेशाच्यादृष्टीने महत्वाच्या विषयांच्याच परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या ४१ विषयांपैकी २९ विषयांची परीक्षा घेण्यात येणार आहे. उत्तर दिल्लीसोडून देशड्टारात दहावीच्या राहिलेल्या विषयांची परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे, तर बारावीच्या कला, शास्त्र, वाणिज्य शाखांच्या जुन्या आणि नव्या अड्टयासक्रमाच्या १२ विषयांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ‘सध्याच्या परिस्थितीत नेमके वेळापत्रक जाहीर करणे शक्य नाही,’ असे स्पष्ट करून परीक्षेपूर्वी दहा दिवस आधी विद्यार्थ्यांना वेळापत्रक देण्यात येईल असे मंडळाने सांगितले आहे. त्याचप्रमाणे परीक्षांचे मूल्यांकन कसे करावे याचे तपशीलही शाळांना स्वतंत्रपणे कळवण्यात येतील, असे मंडळाने सांगितले आहे. सध्या झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनही रखडले आहे. ते कसे करावे याबाबतही शिक्षकांना सूचना देण्यात येणार आहे.

*  सरासरी गुण

नववी आणि अकरावीच्या परीक्षा या मंडळाच्या परीक्षांनंतर शाळा घेतात. त्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला असून विद्यार्थ्यांच्या वर्षड्टारातील चाचण्या, प्रकल्प यांच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करून पुढील वर्गातील प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात यावा, अशा सूचना सीबीएसईने दिल्या आहेत. मूल्यांकन कसे करावे याचे तपशील स्वतंत्रपणे शाळांना कळवण्यात येणार आहेत.

* पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द

राज्यातील शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता सीबीएसईनेही पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

* कोणत्या विषयाची परीक्षा होणार?

बिझिनेस स्टडीज, भूगोल, हिंदी (वैकल्पिक आणि बंधनकारक), गृहशास्त्र,  समाजशास्त्र, संगणक शास्त्र (जुना आणि नवा अभ्यासक्रम),  इन्फोर्मेशन प्रॅक्टिस (जुना आणि नवा अभ्यासक्रम), माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान

* दहावीच्या ७  विषयांची परीक्षा

करोनाच्या साथीपूर्वी उत्तर दिल्लीच्या अनेक  भागांत हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे दिल्लीतील परीक्षांवर त्याचा परिणाम झाला होता. त्यानंतर करोनाची साथ यामुळे दिल्लीत अधिक विषयांच्या परीक्षा राहिल्या आहेत. दिल्लीत दहवीच्या ७ तर बारावीच्या ११ विषयांची परीक्षा घेण्यात येणार आहे.