News Flash

सीसीटीव्ही प्रकल्प कूर्मगतीने

पश्चिम रेल्वेच्या १०० लोकल गाड्यांपैकी ४७ गाड्यांमधील महिला डब्यात सीसीटीव्ही कॅ मेरे आणि नऊ डब्यांत ‘टॉक बॅक’ यंत्रणा आतापर्यंत बसवण्यात आली आहे.

केवळ ४७ लोकलमधील महिला डब्यांत कॅमेरे

मुंबई : लोकल गाड्यांतील गुन्ह््यांना आळा घालण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी यासाठी लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्हींबरोबरच ‘टॉक बॅक’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला होता. परंतु तीन वर्षांनंतरही प्रकल्प धीम्या गतीने पुढे सरकत आहे. पश्चिम रेल्वेच्या १०० लोकल गाड्यांपैकी ४७ गाड्यांमधील महिला डब्यात सीसीटीव्ही कॅ मेरे आणि नऊ डब्यांत ‘टॉक बॅक’ यंत्रणा आतापर्यंत बसवण्यात आली आहे.

सीसीटीव्हीमुळे लोकलमधील गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत मिळेल, तर डब्यात असलेल्या स्पीकरमार्फत महिला प्रवासी गार्ड किंवा मोटरमनशी संवाद साधून तात्काळ मदत मागू शकते, यासाठी ‘टॉक बॅक’ यंत्रणा बसवण्यात येत आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी १२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र त्याचा गैरवापर होण्याची शक्यता, होणारा खर्च, यंत्रणा हाताळण्यासाठी गार्ड, मोटरमनसोबतच रेल्वे सुरक्षा दलावर पडणारा ताण इत्यादींमुळे ‘टॉक बॅक’ यंत्रणेचा विस्तार केला जाणार नाही, असे पश्चिम रेल्वेकडून नंतर स्पष्ट करण्यात आले होते. येत्या काही वर्षांत वातानुकूलित लोकल गाड्या दाखल होणार असल्याने ही यंत्रणा केवळ याच गाड्यांमध्ये असेल, असे स्पष्ट के ले होते. परंतु वातानुकूलित लोकल प्रकल्प काहीसा मागे पडला. त्यामुळे सीसीटीव्ही कॅ मेरे व ‘टॉक बॅक’ यंत्रणा पुढे सरकवण्याचा निर्णय घेतला.

‘मेरी सहेली’ योजना

महिला प्रवाशांच्या मदतीसाठी ‘सखी’ हा ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ही तयार करण्यात आला. यात महिला प्रवासी संघटना, महिला रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, महिला लोहमार्ग पोलीस, रेल्वेतील महिला अधिकारी सदस्य आहेत. असे नऊ ‘सखी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ असून ७५० हून अधिक महिला सदस्य आहेत. तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ‘मेरी सहेली’ योजना लागू के ली. प्रवासातील समस्यांबाबत या योजनेतून मदत के ली जाते.

महिला डब्यात घुसखोरी

२०२० आणि २०२१ मध्ये महिलांच्या आरक्षित डब्यात घुसखोरी करणाऱ्या ३,९२२ पुरुष प्रवाशांना आणि ८ हजार ८१८ फे रीवाल्यांना पकडण्यात आले. तर सतर्कतेमुळे प्रवासादरम्यान ५४  महिला प्रवाशांचे प्राणही वाचवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:02 am

Web Title: cctv project local train crime immediate help to female passengers akp 94
Next Stories
1 खेरवाडीमध्ये घराची भिंत पडून एक ठार
2 नौदल अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा
3 मारहाणीविरोधात नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल
Just Now!
X