News Flash

सुशांत सिंह राजपूतच्या इमारतीचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मुंबई पोलिसांच्या ताब्यात

सुशांत सिंहच्या घरात कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता

सुशांत सिंह राजपूत ज्या इमारतीत  वास्तव्य करत होता त्या इमारतीचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या घरात कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. पोलीस आता फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहात आहेत असं झोन ९ चे डिसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी स्पष्ट केलं आहे.

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळं बॉलिवूड हादरलं. दरम्यान सुशांत सिंह राजपूत हा घराणेशाहीचा बळी ठरला असा एक वाद सुरु झाला. सुशांत सिंह राजपूत याला सिनेमा मिळू दिले नाहीत असेही आरोप झाले. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर या गोष्टी समोर आल्याने पोलिसांनी या अनुषंगाने तपास करण्यास सुरुवात केली आहे. सुशांतची जवळची मैत्रीण रिया हिचीही चौकशी झाली. एवढंच नाही तर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही या प्रकरणी चौकशी झाली. यशराज फिल्म्स, नेटफ्लिक्सचे संचालक यांनाही काही प्रश्न पोलिसांनी विचारले. एवढंच नाही तर यशराजसोबत सुशांतचा काय करार झाला होता? त्याची प्रतही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली.

अभिनेत्री कंगना रणौतने सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची घराणेशाहीचा बळी ठरल्याचं म्हणत बॉलिवूडमधल्या घराणेशाहीला पुन्हा एकदा वाचा फोडली. कंगनाने या सगळ्या प्रकरणी भाष्य केल्यानंतर इतरही काही कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्यावर कसा अन्याय झाला, त्यांना कसं डावलण्यात आलं त्यावर भाष्य केलं. आता सुशांत सिंह राजपूत ज्या वांद्रे येथील इमारतीत वास्तव्य करत होता त्या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 2:10 pm

Web Title: cctv recording of sushant singh rajputs building in the custody of mumbai police scj 81
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 Video : अशोक पत्की अन् हरिप्रसाद चौरसिया यांच्या मैत्रीचा किस्सा
2 सुशांतच्या ‘दिल बेचारा’ ट्रेलरने ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’लाही टाकलं मागे
3 “त्या व्यक्तीविरोधात झाली कारवाई”; अभिनेत्रीने मानले पोलिसांचे आभार
Just Now!
X