News Flash

उत्सवाचे कौटुंबिक क्षण टिपून बक्षिसे जिंकण्याची संधी

स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, घरचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक ही माहितीही पाठविणे आवश्यक आहे.

‘लोकसत्ता सेलिब्रेशन मोमेंट्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लोकसत्ता’ आणि वीणा वल्र्डतर्फे ‘सेलिब्रेशन मोमेंट्स’

गणेशोत्सव म्हणजे केवळ गणरायाच्या आराधनेचाच उत्सव नव्हे तर, तो कुटुंबाच्या, समाजाच्या एकत्रित येण्याचाही सण आहे. अशा उत्सवाच्या काळात असंख्य सुखाचे क्षण आपल्या मनपटलावर दरवर्षी उमटत असतात. यातील अनेक क्षण हृदयाच्या हळूवार कोपऱ्यात जपूनही ठेवले जातात. अशाच भक्तिभावाने ओथंबलेल्या उत्सवी क्षणांना चित्रबद्ध करून आनंद द्विगुणित करण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून दिली जात आहे.

‘लोकसत्ता’ आणि ‘वीणा वर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसत्ता सेलिब्रेशन मोमेंट्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा करतानाचे छायाचित्र या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी पाठवायचे आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान तुम्ही काही समाजाभिमुख संकल्प केला असेल तर त्याची १५० शब्दांपर्यंतची माहिती या छायाचित्रासोबत जोडायची आहे.

स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, घरचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक ही माहितीही पाठविणे आवश्यक आहे. विजेत्यांची छायाचित्रे ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित केली जाणार आहेत. अर्थात याबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे. सहभागी सर्व गणेशभक्तांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी यात मिळणार असून छायाचित्र पाठविण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर आहे. स्पर्धकांनी आपले छायाचित्र loksattagums2017@gmail.com या ई-मेलवर पाठवायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 2:49 am

Web Title: celebration moments by loksatta and veena world
Next Stories
1 लाख हाल झाले तरी.. उद्रेक विझतो कसा?
2 रेल्वे प्रवास आणखी काही दिवस खडतर
3 गणेशोत्सव आणि पावसामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब
Just Now!
X