20 September 2020

News Flash

पत्नीचे अश्लील फोटो कोर्टात सादर करणाऱ्या सेलिब्रिटी ट्रेनर विरोधात गुन्हा

पत्नीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो न्यायालयात सादर केल्यामुळे माजी मिस्टर इंडिया आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अडचणीत सापडला आहे.

सौजन्य - मुंबई मिरर

पत्नीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो न्यायालयात सादर केल्यामुळे माजी मिस्टर इंडिया आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अडचणीत सापडला आहे. सध्या हे जोडपे वेगळे रहात असून वांद्रे कौटुंबिक न्यायालयात त्यांचा घटस्फोटाचा खटला सुरु आहे. बीकेसी पोलिसांनी पती विरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन ते फोटो फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

माझ्या सासूबाईंनी माझे न्यूड फोटो त्यांच्याकडे असून ते व्हायरल करण्याची मला धमकी दिली होती. मागच्यावर्षीच मी पोलिसांना याबद्दल माहिती दिली होती असे पत्नीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र रहात असताना माझे त्यावेळचे काही आक्षेपार्ह फोटो नवऱ्याकडे आहेत.

माझ्या नवऱ्याने कोर्टात सादर केलेले आक्षेपार्ह फोटोपाहून मला धक्का बसला. दुसऱ्या महिलेचे हे फोटो असून त्यावर माझा चेहरा लावण्यात आला आहे असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. एका महिला म्हणून माझ्यासाठी हे खूप घृणास्पद, धक्कादायक आहे. मी एका अल्पवयीन मुलीची आई सुद्धा आहे असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

नवऱ्याने कौटुंबिक न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हे मॉर्फ केलेले फोटो नसून अज्ञात इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्याला हे फोटो मिळाले असे म्हटले आहे. या जोडप्याचा जानेवारी २०१३ मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी असून ती आईसोबत रहाते. पती फिटनेस ट्रेनर असण्याबरोबरच त्याची दक्षिण मुंबईत एक जीमही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 12:16 pm

Web Title: celebrity fitness trainer booked for submitting wifes obscene photoin in court
Next Stories
1 अण्णांच्या मागण्या मान्य न झाल्यास खळखट्याक; तृप्ती देसाईंचा सरकारला इशारा
2 पश्चिम बंगालमधील राजकीय युद्ध ही अराजकतेची ठिणगी: शिवसेना
3 संक्रमण शिबिरांतील रहिवाशांना हक्काचे घर
Just Now!
X