टाटा कर्करोग केंद्राच्या सहकार्याने अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी

परळ येथील हाफकिन संशोधन व प्रशिक्षण संस्थेने टाटा कॅन्सर केंद्राच्या सहकार्यातून देशातील अग्रगण्य विषाणू संशोधन केंद्र उभारण्याची योजना तयार केली आहे. देशातील प्रमुख विषाणू संशोधन संस्थांमध्ये सर्व प्रकारच्या विषाणूंवर संशोधन व उच्च शिक्षण दिले जात नाही हे लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या विषाणूंवर संशोधन तसेच चाचण्या आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ नजीकच्या काळात उभे राहणार आहे. सुमारे वीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून हाफकिन व टाटा कॅन्सर संयुक्तपणे याचा खर्च करणार आहेत.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
adani realty msrdc latest marahti news
वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

जवळपास ११८ वर्षे जुन्या असलेल्या या हाफकिन संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे माहात्म्य एकेकाळी खूप होते. तथापि गेल्या तीन दशकांपासून शासनाच्या उदासीनतेमुळे येथील गुणात्मक संशोधन जवळपास ठप्प झाले आहे. त्याचप्रमाणे संशोधकांसह जवळपास साठ टक्के पदे रिक्त असून अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निधीही उपलब्ध करून दिला जात नाही.

येथील जीव रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, विषाणुशास्त्र, पेशीय जीवशास्त्र विभागात अनेक उपक्रम सुरू असून गेल्या काही वर्षांत ‘एचवन-एनवन इन्फ्लुएंझा’ विषाणूपासून स्वाइन फ्लूपर्यंत नवनवीन विषाणूंचा वाढता प्रभाव लक्षात घेता एकाच छत्राखाली सखोल संशोधन, चाचण्या तसेच उच्चशिक्षण यावे अशी भूमिका घेत हाफकिनच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. राजन बडवे यांच्याकडे संयुक्तपणे अत्याधुनिक विषाणू संशोधन संस्था उभारण्याचा प्रस्ताव मांडला. डॉ. बडवे यांनीही हा प्रस्ताव मान्य केला असून लवकरच या सर्वसमावेशक संस्थेची उभारणी करण्यात येणार आहे.

आजमितीला देशात पुण्याची ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’, मुंबईतील ‘इंट्रो व्हायरस रिसर्च सेंटर’ तसेच नोएडातील ‘अमिटी इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’ अशी निवडक केंद्रे असून नवनव्या विषाणूंचे वाढते हल्ले व नवीन तंत्रज्ञानाचा विचार करून चाचणी, संशोधन व उच्चशिक्षण देणारे सर्वसमावेशक केंद्र उभारण्याची योजना डॉ. निशिगंधा नाईक यांनी आखली आहे. टाटा कॅन्सरमधील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात प्रामुख्याने कॅन्सरसंबंधातील विषाणूंवर संशोधन होत असून त्यांचे सहकार्य मोलाचे ठरणारे आहे.

हाफकिनमधील विद्यमान विषाणुशास्त्र विभागात विषाणुशास्त्रातील तांत्रिक कौशल्य व प्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.   तीन विद्यार्थी पीएच.डी. तर दोघे जण एम.एस्सी. करत असून संभाव्य विषाणूविरोधी एजंट म्हणून वनस्पती प्रथिन व पेपाटाईडचे निर्धारण, कर्करोगविरोधी औषध आर्नोटिकॉनचे विश्लेषण, एचआयव्हीविरोधी औषधी द्रव्यांचे क्रियाकल्प मूल्यांकन, रेडिओ ट्रेसर तंत्राचा वापर करून आयुर्वेदिक औषधांचे प्रमाणीकरण आदी अनेक संशोधन प्रकल्प सुरू आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्स बनल्यानंतर या संशोधन केंद्राला एक नवीन मिती लाभेल असे, डॉ. निशिगंधा नाईक यांनी सांगितले.

वीस कोटींचा खर्च अपेक्षित

सर्व प्रकारच्या विषाणूंवर संशोधन तसेच चाचण्या आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’उभारण्यासाठी सुमारे वीस कोटी रुपयांचा खर्च हाफकिन व टाटा कॅन्सर केंद्राकडून संयुक्तपणे करण्यात येणार आहे. २००५ साली उद्भवलेला लेप्टोस्पायरोसीसचा प्रादुर्भाव, त्यानंतर २००९ सालचा स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव तसेच अॅन्थ्रेक्स आदी वेगवेगळ्या विषाणू हल्ल्याच्या वेळी हाफकिनमधील विषाणुशास्त्र विभागाने महत्त्वाचे योगदान दिले आहे.