करोना संकटामुळे गेल्या मार्च महिन्यांपासून बंद असणारी मुंबईकरांची जीवनवाहिनी ठरलेली उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता नेहमीप्रमाणे सरसकट सर्वांना एकाच वेळी रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी चर्चा यावेळी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यादरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत २९ जानेवारीपासून अतिरिक्त २०४ लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सध्या सुरु असलेल्या लोकल फेऱ्यांची संख्या २७८१ वरुन २८९५ वर पोहोचणार आहे. मध्य रेल्वेने लोकल फेऱ्यांची संख्या १५८० वरुन १६८५ तर पश्चिम रेल्वेने १२०१ वरुन १३०० वर नेण्याचा निर्णय घेतला आहे.

उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच

दरम्यान रेल्वेतून सर्वसामान्यांना प्रवास करु देण्यासंबंधीचा निर्णय अद्याप झालेला नाही. यामुळे रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करता येणार आहे. इतरांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच प्रवाशांना करोनासंबंधित नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे.

मुंबई लोकल खरंच सर्वांसाठी सुरु होणार?
सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबई विभागाने सर्व उपनगरीय सेवा सुरु करण्यासंबंधी विनंती मिळाल्याचा उल्लेख आहे. तसंच सर्व सेवा २९ जानेवारीपासून सुरु करण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे. यावरुन सोशल मीडियावर २९ जानेवारीपासून सर्वांना लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली.

मात्र सोशल मीडियावर या फोटोचा चुकीचा संदर्भ जोडल्याचं समोर आलं. लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा उल्लेख यामध्ये असून प्रवाशांचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central and western railway additional services networto the mumbai suburban k sgy
First published on: 27-01-2021 at 08:14 IST