13 August 2020

News Flash

केंद्रीय निवडणूक आयुक्त दोन दिवस मुंबईत

निवडणुकीच्या तयारीचा आढावा

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा, आयुक्त अशोक लवासा व सुशीलचंद्र मंगळवारी मुंबईत येत आहेत. आयोगाच्या वतीने मंगळवारी व बुधवारी सलग दोन दिवस बैठका आयोजित करण्यात आल्या असून, त्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली.

राज्य विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतोय, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. निवडणूक आचारसंहिता कधीही लागेल, म्हणून मंत्रालयातही अधिकारी-कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे. मंत्रालयात कामे घेऊन येणाऱ्यांची वर्दळही नेहमीपेक्षा वाढलेली आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त व अन्य दोन आयुक्त मुंबईत येऊन दोन दिवस संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीची माहिती घेणार आहेत. गृहविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्भय व शांततेच्या वातावरणात कशी पार पाडली जाईल, याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 2:09 am

Web Title: central election commissioner in mumbai for two days abn 97
Next Stories
1 राज्य अन्न आयोगासाठी सरकारवर बडगा
2 लोकलमधील धक्काबुक्कीमुळे कर्करोगग्रस्त बालिकेचा मृत्यू
3 शिक्षक भरती सुरू; घोळ कायम
Just Now!
X