अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
मध्य रेल्वे
कुठे – कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर
कधी – सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा कल्याण ते ठाणे यादरम्यान धिम्या मार्गावरून चालवण्यात येतील. या गाडय़ा कल्याण ते ठाणे या स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. तर ठाण्यापुढे या गाडय़ा पुन्हा एकदा जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच अप आणि डाउन मार्गावरील जलद गाडय़ा आपल्या नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. ब्लॉकच्या काळात काही सेवा रद्द केल्या जातील. तसेच रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकात रद्द करून दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातूनच रत्नागिरीच्या दिशेने चालवण्यात येईल. या दरम्यान वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू असेल.
हार्बर मार्ग
कुठे – कुर्ला ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर
कधी – सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिन ते पनवेल या दरम्यानची वाहतूक बंद राहील. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल, बेलापूर, नेरूळ येथून वाशीपर्यंत आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून कुल्र्यापर्यंत काही सेवा चालवल्या जातील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना अधिकृत तिकिटासह ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.